Anil Kumble News: 'इतकी संधी तर पुजारालाही मिळाली नव्हती..', सुपरफ्लॉप गिलबाबत अनिल कुंबळेंचं मोठं वक्तव्य

Anil Kumble On Cheteshwar Pujara: शुभमन गिल सध्या सुपरफ्लॉप ठरत आहे. दरम्यान या सुमार कामगिरीनंतर माजी भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
anil kumble
anil kumblesaam tv news
Published On

Anil Kumble On Cheteshwar Pujara:

शुभमन गिलला जितकी संधी दिली जात आहे तितकी संधी चेतेश्वर पुजाराला मिळाली नाही, असं वक्तव्य अनिल कुंबळे यांनी केलं आहे. शुभमन गिल गेल्या काही सामन्यांमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. आपल्या कसोटी कारकिर्दीची दमदार सुरुवात करणारा गिल हैदराबाद कसोटीतील पहिल्या डावात २३ तर दुसऱ्या डावात शून्यावर बाद होऊन माघारी परतला.

काय म्हणाले अनिल कुंबळे?

भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज अनिल कुंबळे म्हणाले की, ' गिलला जितकी संधी मिळाली आहे तितकी चेतेश्वर पुजाराला कधीच मिळाली नाही. त्याला तर १०० कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. मी नेहमी पुजाराचा उल्लेख करतो कारण गेल्या काही वर्षांपासून तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतोय. पुजारा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये शेवटची इनिंग खेळला त्यानंतर गिलला तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली जात आहे.'

anil kumble
IND vs ENG: गिलने कितव्या क्रमांकावर फलंदाजीला यावं? दिग्गजाने दिला मोलाचा सल्ला

गिलला मोलाचा सल्ला..

अनिल कुंबळे यांचं म्हणणं आहे की, राहुल द्रविड त्याला फॉर्ममध्ये येण्यास मदत करू शकतो. अनिल कुंबळे म्हणाले की, ' त्याने बिनधास्त होऊन खेळायची गरज आहे. त्याला धावा करण्याची गरज आहे. फिरकी गोलंदाजीविरुद्ध कसं खेळावं यासाठी त्याला रणनीती आखावी लागेल. तो फ्लॅट ट्रॅकवर ठीक आहे. मात्र जिथे चेंडू फिरतोय, चेंडू खाली राहतोय किंवा संथ गतीने येतोय त्यावेळी तुम्हाला हातांचा वापर करून आणि नियंत्रण ठेवून फलंदाजी करावी लागेल.' (Latest cricket news in marathi)

anil kumble
IND vs ENG: मोठी बातमी! KL Rahul सह प्रमुख खेळाडू संघातून बाहेर; दुसऱ्या कसोटीसाठी या ३ खेळाडूंना भारतीय संघात स्थान

शुभमन गिल गेल्या ११ कसोटीत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. यादरम्यान त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. त्याने मार्च २०२३ मध्ये १२८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर ३६ ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे. गेल्या ११ कसोटीत त्याने १७.३० च्या सरासरीने अवघ्या १७३ धावा केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com