Rahul Dravid: भारतासह राहुल द्रविड खेळलाय या देशासाठी! ११ सामन्यांमध्ये पाडलाय धावांचा पाऊस

Rahul Dravid Birthday Special: भारतीय संघाचा स्टार खेळाडू राहुल द्रविड आज आपला ५१ वा वाढदिवस साजरा करतोय.
rahul dravid
rahul dravid saam tv news
Published On

Rahul Dravid Played For Scotland:

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना द वॉल असंही म्हटलं जातं. वयाची २५ वर्षी पूर्ण केलेल्यांचा बालपणीचे हिरो म्हणजे राहुल द्रविड. राहुल द्रविड यांनी आपल्या शांत आणि संयमी स्वभावाने सर्वांच्याच मनात घर केलं.

स्वभावाने जितक शांत याउलट फलंदाजी करताना ते तितकेच खडूस होते. शोएब अख्तर, ग्लेन मॅकग्रासारख्या गोलंदाजांना त्यांनी रडवून सोडलं होतं. यादरम्यान त्यांनी अनेक मोठे रेकॉर्ड्सही आपल्या नावावर केले आहेत. मात्र भारतीय संघासाठी रेकॉर्ड्सचा पाऊस पाडलेल्या राहुल द्रविडने आणखी एका देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. हे खूप कमी लोकांना माहीत आहे.

राहुल द्रविड यांनी भारतीय संघाव्यतीरिक्त स्कॉटलँड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. राहुलने या संघासाठी १-२ नव्हे तर तब्बल ११ सामने खेळले आहेत. राहुलच्या स्कॉटलँड मुक्कामासाठी तेथील NRI मदतीला धावून आले होते. त्यांनी काही कार्यक्रमांचे आयोजन करत निधी देखील गोळा केला होता.

rahul dravid
IND vs AFG , 1st T20I Weather Update: पाऊस नव्हे तर या कारणामुळे भारत- अफगाणिस्तान सामना होणार रद्द? समोर आलं मोठं कारण

राहुल द्रविड यांनी स्कॉटलँडचे प्रतिनिधित्व करताना पहिल्या सामन्यात २५ धावा केल्या होत्या. पहिल्या सामन्यात मोठी खेळी न करु शकलेल्या राहुलने पुढील सामन्यांमध्ये दमदार कमबॅक केले. त्याने ११ सामन्यांमध्ये २ शतकं आणि ८ अर्धशतकं झळकावली. यासह त्याने ६६६ धावा केल्या होत्या. मात्रा तो स्कॉटलँडला विजय मिळवून देऊ शकला नव्हता. (Latest sports updates)

rahul dravid
IND vs AFG T20 Match: केव्हा,कधी अन् कुठे रंगणार भारत-अफगाणिस्तान पहिला टी-२० सामना? जाणून घ्या

राहुल द्रविड हे भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज आहेत. त्यांनी अनेक कसोटी सामन्यांमध्ये मोलाची भूमिका बजावत संघाला विजय मिळवून दिला होता.सध्या ते भारतीय संघाच्या मुख्यप्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहे.

तसेच राहुल द्रविडच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी १६४ कसोटी सामन्यांमध्ये ५२.३ च्या सरासरीने १३२८८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यांनी ६३ अर्धशतक आणि ३६ शतकं झळकावली आहेत. तर ३४४ वनडे सामन्यांमध्ये त्यांनी १०८८९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यांनी ८३ अर्धशतकं आणि १२ शतकं झळकावली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com