IND vs AFG T20 Match: केव्हा,कधी अन् कुठे रंगणार भारत-अफगाणिस्तान पहिला टी-२० सामना? जाणून घ्या

When And Where To Watch India vs Afganistan 1st T20I Match: टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानचा संघ ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला आहे.
When And Where To Watch India vs Afghanistan 1st T20I Match
When And Where To Watch India vs Afghanistan 1st T20I Matchsaam tv news

India vs Afghanistan 1st T20I Match Live Streaming Details:

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानचा संघ ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना येत्या ११ जानेवारी रोजी खेळला जाणार आहे.

अफगाणिस्तानचा संघ भारतीय संघाला अजुनही टी-२० मालिकेत हरवू शकलेला नाही. त्यामुळे भारती य संघाला भारतात येऊन हरवणं हे अफगाणिस्तानसमोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे.

केव्हा सुरु होणार पहिला टी-२० सामना?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी-२० सामना ११ जानेवारी रोजी रंगणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे.तर इब्राहिम जदरान ही अफगाणिस्तान संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरु होईल. तर सामन्याची नाणेफेक संध्याकाळी साडे सहा वाजता केली जाईल.

When And Where To Watch India vs Afghanistan 1st T20I Match
IND vs SA 2nd Test: मन जिंकलस भावा! सिराज कौतुक करत असताना बुमराहने जे केलं ते पाहुन अभिमानच वाटेल; Video

इथे पाहु शकता लाईव्ह..

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याचे लाईव्ह प्रसारण स्पोर्ट्स १८ वर पाहायला मिळणार आहे. तसेच हा सामना तुम्ही मोबाईलवरही लाईव्ह पाहु शकता.तुम्ही जियो सिनेमा अॅपवर या सामन्याचा आनंद घेऊ शकतात.

कुठे रंगणार भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला सामना?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणारा पहिला टी-२० सामना मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियमवर रंगणार आहे. (Latest sports updates)

या मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ:

भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार

अफगाणिस्तान:

इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), इकराम अलिखिल (यष्टीरक्षक), हजरतुल्लाह जजई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमतुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब-उर-रहमान, फजलहक फारूकी, फरीद अहमद, नवीन-उल-हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, केस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com