Team India: एका जागेवर तिघांचा दावा; टी-२० वर्ल्ड कपमध्ये कोण होणार रोहितचा सलामीचा पार्टनर?

Team India Opening Pair: रोहित शर्मा सलामीला येणार यात काहीच शंका नाही. मात्र रोहित शर्मानंतर डावाची सुरुवात कोण करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
who will open the innings with rohit sharma in india vs afghanistan t20i series amd2000
who will open the innings with rohit sharma in india vs afghanistan t20i series amd2000saam tv news
Published On

Team India Opening Pair For IND vs AFG T20I Series:

भारतीय संघ येत्या ११ जानेवारीपासून अफगाणिस्तानविरुद्ध ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने येणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली टी-२० क्रिकेट खेळताना दिसून आले नव्हते.

दरम्यान हे दोघेही या मालिकेतून कमबॅक करताना दिसून येणार आहे. रोहित शर्मा सलामीला येणार यात काहीच शंका नाही. मात्र रोहित शर्मानंतर डावाची सुरुवात कोण करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भारतीय संघात एकापेक्षा एक आक्रमक खेळाडू आहे. सर्व खेळाडूंमध्ये प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळवण्यासाठी चुरशीची लढत सुरु आहे. ज्यात सलामीला जाण्यासाठी रोहित शर्मासह शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांचा समावेश आहे.

तसेच विराट कोहलीही अनेकदा टी-२० क्रिकेटमध्ये डावाची सुरुवात करताना दिसून आला आहे. त्यामुळे पहिल्या टी-२० सामन्यात रोहित शर्मासोबत सलामीला कोण जाणार? कोणाला मिळू शकते संधी? जाणून घ्या.

who will open the innings with rohit sharma in india vs afghanistan t20i series amd2000
IND vs AFG: अफगाणिस्तानला मोठा धक्का! स्टार खेळाडू टी-२० मालिकेतून होऊ शकतो बाहेर

अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्यासारखे फलंदाज खेळताना दिसून येणार नाहीत. त्यामुळे विराट सलामीला फलंदाजीला येण्याची चूक करणार नाही. तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. त्यानंतर टीम मॅनेजमेंटसमोर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल असे दोन पर्याय आहेत. (Latest sports updates)

who will open the innings with rohit sharma in india vs afghanistan t20i series amd2000
IND vs AFG: टीम इंडियाची प्लेइंग ११ ठरली! अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० साठी या ११ खेळाडूंना मिळू शकते संधी

कोणाला मिळणार स्थान?

गेल्या काही सामन्यातील रेकॉर्ड पाहिला तर यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांना टी-२० क्रिकेटमध्ये हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. जयस्वालने ३१ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर शुभमन गिलने २६ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

टीम मॅनेजमेंटला लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन हवं असेल यशस्वी जयस्वालला डावाची सुरुवात करण्याची संधी दिली जाऊ शकते. तसेच गेल्या काही सामन्यांमध्ये जयस्वालचा रेकॉर्ड हा गिलपेक्षा चांगला राहिला आहे. त्यामुळे रोहितसोबत जयस्वाल डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com