केपटाऊन कसोटीत भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर दमदार कामगिरी करत ७ गडी राखून विजय मिळवला. यासह मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त केली आहे.
या सामन्यात भारतीय गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला आहे पहिल्या डावात मोहम्मद सिराजने सर्वाधिक ६ गडी बाद केले. तर दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने ६ गड बाद केले. या सामन्यानंतर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात मोहम्मद सिराज जसप्रीत बुमराहचं कौतुक करताना दिसून येत आहे.
मोहम्मद सिराजने या सामन्यातील पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची पळता भुई थोडी केली. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या ६ फलंदाजांना माघारी धाडलं. दरम्यान गोलंदाजीत त्याला जसप्रीत बुमराहने कशी मदत केली याचा खुलासा त्याने सामन्यानंतर केला. (Latest sports updates)
हा सामना झाल्यानंतर बोलताना तो म्हणाला की, ' जसप्रीत बुमराहने मला अचूक लाईन लेंथवर गोलंदाजी करायला मदत केली. बुमराहने मला सांगितलं होतं की, अचूक लाईन लेंथवर गोलंदाजी करत रहा, याशिवाय दुसरं काही करण्याचा प्रयत्न करू नको. गेल्या सामन्यात मी चांगल्या लेंथवर गोलंदाजी करू शकलो नव्हतो. त्यामुळे विरोधी संघातील फलंदाज सहज धावा करू शकले. मी चुकांमधून शिकलो आणि चांगली गोलंदाजी केली.'
मुख्य बाब म्हणजे जसप्रीत बुमराह ट्रांसलेटरच्या भूमिकेत होता. बुमराह म्हणाला की, ' त्याला अचूक लाईन लेंथवर गोलंदाजी करताना अडचण येत होती. मी त्याला इतकच सांगितलं की, चांगल्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी कर.'
पुढे सिराज बुमराहचं कौतुक करतो. मात्र स्वतः बद्दल केलेलं कौतुक बुमराह ट्रांसलेट करून सांगत नाही. हाच बुमराहचा मोठेपणा आहे. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.