IND vs SA 2nd Test: केपटाऊनमध्ये इतिहास घडला! दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत टीम इंडियाची मालिकेत १-१ ची बरोबरी

India vs South Africa 2nd Test Highlights: केपटाऊनच्या मैदानावर भारतीय संघाने इतिहास रचला आहे. जे कोणालाच जमलं नव्हतं ते रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने करुन दाखवलं आहे
team india
team indiatwitter

India vs South Africa 2nd Test Day 2 Highlights:

केपटाऊनच्या मैदानावर भारतीय संघाने इतिहास रचला आहे. जे कोणालाच जमलं नव्हतं ते रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने करुन दाखवलं आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर ७ गडी राखून विजय मिळवला आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला ७९ धावांची गरज होती. हे आव्हान सहज पूर्ण करत भारतीय संघाने कसोटी मालिकेत १-१ ची बरोबरी साधली आहे.

दक्षिण आफ्रिकेने दिलं ७९ धावांचं आव्हान..

या सामन्यातील दोन्ही डावात दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर सुपरफ्लॉप दिसून आले. भारतीय संघाचा डाव १५३ धावांवर आटोपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला आला होता.

पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचे ३ फलंदाज माघारी परतले होते. एकिकडे विकेट्स जात असताना एडन मार्करमने एक बाजू धरुन ठेवली. त्याने शतकी खेळी करत दक्षिण आफ्रिकेचा डाव १७६ धावांपर्यंत पोहचवला. यासह दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला विजयासाठी ७९ धावांचं आव्हान दिलं. (Latest sports updates)

team india
IND vs SA 2nd Test: अवघ्या ११ चेंडूत पडल्या टीम इंडियाच्या ६ विकेट्स! केपटाऊन कसोटीत नेमकं काय घडलं?

भारतीय गोलंदाज चमकले.

या सामन्यातील दोन्ही डावात भारतीय गोलंदाजांनी दमदार खेळ केल्याचे पाहायला मिळाले आहे. पहिल्या डावात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली. त्याने पहिल्या डावात १५ धावा खर्च करत ६ गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराह दुसऱ्या डावात भारतीय संघाचा हिरो ठरला. त्याने ६१ धावा खर्च करत ६ गडी बाद केले.

team india
Virat Kohli: नजरेला नजर भिडली!नांद्रे बर्गरने पंगा घेताच विराटने दिली अशी रिॲक्शन;Video

भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय...

भारतीय संघाला सेंच्युरियन कसोटीत १ डाव आणि ३२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाला दुसरा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं होतं.

दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला कमबॅक करण्याची संधी दिलीच नाही. आता ७ गडी राखून हा सामना जिंकत भारतीय संघाने ही मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त केली आहे. यापूर्वी कुठल्याच भारतीय कर्णधाराला केपटाऊनच्या मैदानावर विजय मिळवता आला नव्हता. रोहित असा कारनामा करणारा पहिलाच कर्णधार ठरला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com