IND vs AFG , 1st T20I Weather Update: पाऊस नव्हे तर या कारणामुळे भारत- अफगाणिस्तान सामना होणार रद्द? समोर आलं मोठं कारण

India vs Afghanistan 1st T20I: भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेला आजपासून प्रारंभ होणार आहे.
India vs Afghanistan 1st T20I
India vs Afghanistan 1st T20Isaam tv news

India vs Afghanistan 1st T20I Weather Update:

भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेला आजपासून प्रारंभ होणार आहे. हे दोन्ही संघ पहिल्यांदाच द्विपक्षीय टी -२० मालिका खेळण्यासाठी आमने सामने येणार आहेत. येत्या जून महिन्यात टी -२० वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेच्या दृष्टीकोनाने ही मालिका अतिशय महत्वाची असणार आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. दरम्यान जाणून घ्या कसं असेल हवामान.

हा सामना मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर रंगणार आहे. मोहालीत सध्या कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे धुक्याचं प्रमाण वाढू शकतं. यापूर्वी वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना धुके असल्यामुळे काही मिनिट थांबवण्यात आला होता. हा सामनाही थांबवला जाऊ शकतो किंवा रद्दही केला जाऊ शकतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कमाल तापमान ५-६ डिग्री सेल्सिअस इतकं असेल.

पिच क्युरेटर राकेश कुमार यांनी म्हटले की, ' पीसीएने हिवाळ्यात या मैदानावर देशांतर्गत स्पर्धेतील सामने आयोजित केले आहेत. मात्र या सामन्यांचे आयोजन दिवसा केले गेले होते. एक गोष्ट चांगली आहे की, गेल्या ३-४ दिवसापासून धुके कमी आहेत. दव कमी करण्यासाठी मैदानावर एम्पा केमिकलचा वापर करणार आहोत. ११ ग्राउंड्समनची टीम हा सामना सक्सेसफुल करण्यासाठी प्रयत्नशील आहे.' (Cricket News In Marathi)

India vs Afghanistan 1st T20I
IND vs AFG 1st T20I: टीम इंडियाला मोठा धक्का! विराट कोहली पहिल्या टी-२० सामन्यातून बाहेर; नेमकं कारण काय?

या मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ:

भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार

India vs Afghanistan 1st T20I
IND vs AFG T20 Match: केव्हा,कधी अन् कुठे रंगणार भारत-अफगाणिस्तान पहिला टी-२० सामना? जाणून घ्या

अफगाणिस्तान:

इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), इकराम अलिखिल (यष्टीरक्षक), हजरतुल्लाह जजई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमतुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब-उर-रहमान, फजलहक फारूकी, फरीद अहमद, नवीन-उल-हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, केस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com