टी -२० वर्ल्डकप सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र अजूनही भारतीय संघाची संघ बांधणी झालेली नाही. संघात कोणाला स्थान मिळणार ? तसेच संघाचा कर्णधार कोण असेल हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचा कर्णधार कोण असेल याबाबत मोठा खुलासा केला आहे.
आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला की, ' कदाचित टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत हार्दिक पंड्या भारतीय संघाचा कर्णधार नसेल. कारण तो फिटनेसच्या समस्येने त्रस्त आहे. तो वर्तमानात क्रिकेट खेळत नाहीये. तो वर्ल्डकप स्पर्धेत दुखापतग्रस्त झाला आहे. तो अफगाणिस्तानविरुद्धच्या टी -२० मालिकेत खेळणार नाही, तो कसोटी मालिका खेळणार नाही. तो थेट आयपीएलमध्ये खेळणार. या सर्व गोष्टी त्याच्या विरोधात जात आहेत.' (Latest sports updates)
तसेच कर्णधारपदाबाबत बोलताना तो म्हणाला की, ' मला असं वाटतं की रोहित टी -२० संघाचं नेतृत्व करताना दिसेल. टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतही तो भारतीय संघाचा कर्णधार असेल. जर तुम्ही हा प्रश्न टी -२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेनंतर विचारला असता तर उत्तर कदाचित नाही असू शकलं असतं. कारण त्यावेळी भारतीय संघ १० षटकात ६० धावा करू शकत होता. मात्र आता गोष्टी बदलल्या आहेत.'
टी -२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा येत्या जून महिन्यात रंगणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध टी -२० मालिका खेळणार आहे. या मालिकेला येत्या ११ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची मालिका रंगणार आहे. ही मालिका टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेपूर्वी भारतीय संघाची शेवटची मालिका असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.