राजकोटच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना रंगणार आहे. या सामन्यात सरफराज खानला पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते.
सरफराज खानसह यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला देखील पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते. तिसऱ्या कसोटी सामन्यातून केएल राहुल बाहेर झाला आहे. यापूर्वी झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही केएल राहुल दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्याच्याऐवजी रजत पाटीदारला संधी दिली गेली होती. तो या सामन्यातही खेळताना दिसून येणार नाही.
बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात केएल राहुललाही स्थान दिलं गेलं. मात्र पुढील सामने खेळण्यासाठी त्याला फिटनेस टेस्ट पास करणं गरजेचं होतं. समोर आलेल्या माहितीनुसार, केएल राहुल तिसरा कसोटी सामना खेळण्यासाठी पूर्णपणे फिट नाही. त्यामुळे तो या सामन्यात खेळताना दिसून येणार नाही.
मध्यक्रमातील फलंदाज श्रेयस अय्यर देखील दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. त्यामुळे सरफराज खानचा पदार्पण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तो राजकोट कसोटीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. (Cricket news in marathi)
तर दुसरीकडे यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल देखील पूर्णपणे फ्लॉप ठरला गेल्या ७ सामन्यात त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. त्यामुळे भारतीय संघाकडे ध्रुव जूरेलचा पर्याय उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत ध्रुव जूरेलला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते.
इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या शेवटच्या ३ सामन्यांसाठी असा आहे भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.