इंग्लंडचा स्टार फलंदाज जॉनी बेअरस्टोला भारत - इंग्लंड कसोटी मालिकेत आपली छाप सोडता आलेली नाही. मालिकेतील चारही सामन्यांमध्ये तो फ्लॉप ठरला आहे. मात्र त्याला पाचवा कसोटी सामना खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. कारण हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना असणार आहे. त्यामुळे ब्रेंडन मॅक्क्युलम आणि बेन स्टोक्स त्याला या सामन्यासाठी प्लेइंग ११ मध्ये स्थान देऊ शकतात.
याबाबत बोलताना ब्रेंडन मॅक्क्युलम म्हणाला की, ' त्याने ( बेअरस्टो) किती संघर्ष केलाय हे सर्वांनाच माहित आहे. जॉनी हा खूप भावनिक व्यक्ती आहे. सर्वांसाठीच हा खूप भावुक करणारा क्षण असणार आहे. त्याच्यासाठी हे मैलाचा दगड गाठल्यासारखं असणार आहे. आम्हाला चांगलच माहीत आहे की, तो लवकरच कमबॅक करेल.' (Cricket News In Marathi)
तसेच तो पुढे म्हणाला की, ' आम्हाला बेअरस्टोबाबत काहीच शंका नाही. आम्ही आंधळे नाही, आम्हाला माहीत आहे संघासाठी त्याची काय भूमिका आहे. त्याने संघासाठी अनेकदा महत्वाचं योगदान दिलं आहे. त्याने अनेकदा शानदार कामगिरी केली आहे. तो टॉप क्लास खेळाडू असून त्याने अनेकदा कठीण परिस्थितीतून संघाला बाहेर काढलं आहे. मला खात्री आहे की, तो चांगली कामगिरी करेल.'
जॉनी बेअरस्टो हा इंग्लंड संघातील आक्रमक फलंदाजांपैकी एक आहे. इंग्लंडने जेव्हापासून बॅझबॉल शैलीने क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे, तेव्हापासून त्याची भूमिका आणखी महत्वाची झाली आहे. कारण त्याने अनेकदा मध्यक्रमात फलंदाजीला येऊन संघासाठी मोठी खेळी करत विरोधी संघातील गोलंदाजांवर हल्लाबोल केला आहे. या मालिकेत तो फॉर्ममध्ये नसला तरीदेखील त्याला अंतिम कसोटी सामना खेळण्याची संधी दिली जाणार आहे. इंग्लंडने ही मालिका गमावली आहे. मात्र शेवटचा कसोटी सामना जिंकून इंग्लंडचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत टिकून राहण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.