Dhruv jurel revealed his plan after defeating England in ind vs eng 4th test
Dhruv jurel revealed his plan after defeating England in ind vs eng 4th test twitter

IND vs ENG: ध्रुव जुरेलच्या या खास प्लानमुळे जिंकली टीम इंडिया! सामन्यानंतर स्वतःच केला मोठा खुलासा

India vs England 4th Test, Dhruv Jurel: रांची कसोटीत ध्रुव जुरेल हा भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरला आहे. त्याने दोन्ही डावात महत्वपूर्ण खेळी करत इंग्लंडच्या तोंडचा घास हिसकावून घेतला.
Published on

India vs England 4th test, Dhruv Jurel Statement:

रांची कसोटीत ध्रुव जुरेल हा भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरला आहे. त्याने दोन्ही डावात महत्वपूर्ण खेळी करत इंग्लंडच्या तोंडचा घास हिसकावून घेतला. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना ध्रुव जुरेलने शुभमन गिलसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान या विजयानंतर ध्रुव जुरेलने आपल्या प्लानबाबत खुलासा केला आहे. (Dhruv Jurel)

ध्रुव जुरेलने या सामन्यातील दोन्ही डावात महत्वपूर्ण खेळी केली. पहिल्या डावात त्याचं शतक अवघ्या १० धावांनी हुकलं. तो ९० धावा करत माघारी परतला. तर धावांचा पाठलाग करताना त्याने नाबाद ३९ धावांची खेळी केली. या खेळीबाबत बोलताना तो म्हणाला की, ' मी परिस्थितीनुसार फलंदाजी केली. पहिल्या डावात मला धावा करायच्या होत्या. मला हे ही माहित होतं की, आम्हाला शेवटच्या डावातही फलंदाजी करायची आहे. जर इंग्लंडला मोठी आघाडी मिळाली तर हे आमच्यासाठी धोकादायक ठरू शकलं असतं. त्यामुळे भागीदारी करणं आमच्यासाठी अतिशय महत्वाचं होतं.' (Cricket news in marathi)

Dhruv jurel revealed his plan after defeating England in ind vs eng 4th test
IND vs ENG Test Series: मायदेशात टीम इंडिया शेर! इंग्लंडला नमवत जिंकली सलग १७ वी कसोटी मालिका

सामन्यातील पहिल्या डावात ध्रुव जुरेलने कुलदीप यादवसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. या खेळीचं श्रेय त्याने कुलदीप यादवला देखील दिलं आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला की,' हे क्रेडिट केवळ माझंच नाही. तर त्या प्रत्येक खेळाडूंचं आहे जे माझ्यासोबत उभे राहिले आणि संघासाठी महत्वपूर्ण धावा जोडल्या. मी केवळ चेंडू पाहिला अंक त्यानुसार खेळत राहिलो. दुसऱ्या डावात आम्ही १०-१० धावा जोडत भागीदारी पुढे नेली.

Dhruv jurel revealed his plan after defeating England in ind vs eng 4th test
IND vs ENG 4th Test LIVE: W,W...भारताचा निम्मा संघ तंबूत ! लंचनंतर बशीरने घेतल्या बॅक टू बॅक विकेट्स

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना अवघ्या १२० धावांवर भारतीय संघाने ५ गडी गमावले होते. त्यानंतर ध्रुव जुरेल आणि शुभमन गिलने ७२ धावांची भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. हा सामना भारतीय संघाने ५ गडी राखून जिंकला. या विजयासह भारतीय संघाने ३-१ ने आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com