भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांचीमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पुन्हा एकदा बॅझबॉलची हवा काढत शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान या विजयासह भारतीय संघाच्या नावे आणखी एक मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
या मोठ्या रेकॉर्डची नोंद..
भारतीय संघाला मायदेशात खेळताना २०१२-१३ मध्ये इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी इंग्लंडने भारतीय संघाला २-१ ने पराभूत केलं होतं. या पराभवानंतर भारतीय संघाने १६ कसोटी मालिका खेळल्या. या सर्व मालिकांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे.
आता भारतीय संघाने इंग्लंडला मायदेशात खेळताना धूळ चारली आहे. हा भारताचा मायदेशात खेळताना सलग १७ वा मालिका विजय आहे.२०१२-१३ नंतर भारतीय संघाने सलग १७ मालिका जिंकल्या आहेत. भारतीय संघाच्या नावे मायदेशात खेळताना सर्वाधिक मालिका जिंकण्याची नोंद आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने मायदेशात खेळताना सलग १० कसोटी मालिका जिंकल्या होत्या. (Cricket news marathi)
भारतीय संघाचा शानदार विजय..
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ५ गडी राखून विजय मिळवला आहे. तिसऱ्या दिवसाखेर भारतीय संघाने बिनबाद ४० धावा केल्या होत्या. यशस्वी जयस्वाल १६ तर रोहित शर्मा २४ धावांवर नाबाद होता. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. यशस्वी जयस्वाल ३७ धावा करत माघारी परतला. त्यानंतर रोहित शर्मा अर्धशतकी खेळी करत माघारी परतला.
हे दोघे बाद झाल्यानंतर रजत पाटीदार आणि सरफराज खान आणि रविंद्र जडेजाही स्वस्तात माघारी परतले. इथून भारतीय संघाचा डाव गडगडला होता. शेवटी शुभमन गिल आणि ध्रुव जुरेलने महत्वपूर्ण खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत ३-१ ने आघाडी घेतली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.