Akash Deep Wicket Video : आकाश दीपचा मॅजिकल बॉल; स्टम्प हवेत उडाला, पण दुसऱ्या क्षणाला मैदानात पसरली शांतता

IND vs ENG, 4th Test Match : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात टीम मॅनेजमेंटने जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली आहे. त्यामुळे बुमराहच्या जागी आकाश दीपला संघात स्थान मिळालं आहे.
Akash Deep Wicket Video
Akash Deep Wicket VideoSaam Tv
Published On

IND vs ENG 4th Test Match :

टीम इंडियाचा गोलंदाज आकाश दीप याने पदार्पणाच्या सामन्यातच चमकदार कामगिरी केली आहे. आकाश दीपने बेन डकेटच्या रुपाने आतंरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली. मात्र आकाश दीप याची पहिली विकेट जॅक क्राऊली ठरला असता. मात्र दुर्दैवाने तो नो असल्याने आकाश दीपला थोडी वाट पाहावी लागली. (Latest News)

आकाश दीप पदार्पणाच्या सामन्यात चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने पहिल्याच स्पेलमध्ये जादुई कामगिरी करत क्रिकेट प्रेमींच्या मनात घर केलं. आकाश सुरुवातीपासूनच आक्रमक गोलंदाजी करताना दिसला. आकाशच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडचे खेळाडूचे लेझिम खेळताना दिसले. आकाशने पहिल्याच स्पेलमध्ये इंग्लंडचे तीन खेळाडू तंबूत धाडले.

Akash Deep Wicket Video
India vs England : पदार्पणातच आकाश दीपचा रांचीमध्ये तडाखा, इंग्लंडचा कणा मोडला; तिघांना केलं गारद

मात्र आकाशच्या तीन विकेटपेक्षा त्याच्या नो बॉलवर पडलेल्या विकेटची जास्त चर्चा सुरु आहे. झालं असं की, आकाशने फेकलेल्या चेंडूवर क्राऊलीची दांडीगूल झाली. क्राऊलीची बॅट खाली येऊपर्यंत मागे स्टम्प हवेत उडाले होते. यानंतर अख्ख्या स्टेडियम भारतीय फॅन्सने जल्लोष केला.

आकाशनेही आपल्या कारकिर्दीतल्या पहिल्या विकेटचंही जोरदार सेलिब्रेशन केलं. मात्र त्याचा हा आनंद औटघटकेचा ठरला. कारण आकाश मागे वळून पाहण्याआधीच अम्पायरने तो नो बॉल घोषित केला. त्यानंतर मैदानातही शांतता पसरली.

मात्र आकाशच्या या विकेटचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. वेगाने आलेला चेंडू आणि आणि त्यानंतर उडालेले स्टम्प मागे दूरवर फेकला गेला. त्यानंतर काही वेळातच आकाशने क्राऊलीला पुन्हा क्लीनबोल्ड केलं.

Akash Deep Wicket Video
IPL 2024 Schedule Phase-1:आयपीएल १७ व्या हंगामाचं अर्ध वेळापत्रक जाहीर; 'या' संघांमध्ये रंगणार पहिला सामना

बुमराहच्या जागी मिळाली संधी

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या सामन्यात टीम मॅनेजमेंटने जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली आहे. त्यामुळे बुमराहच्या जागी आकाश दीपला संघात स्थान मिळालं आहे. आकाशने संधीचं सोनं करत पदार्पणाच्या पहिल्याच स्पेलमध्ये इंग्लंडचे तीन फलंदाज माघारी धाडले.

भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारा तो ३१३ वा खेळाडू ठरला. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने आकाश दीपला टेस्ट कॅप देत संघात स्वागत केलं. २७ वर्षीय आकाश दीप मूळचा बिहारच्या डेहरी येथील राहणारा आहे. मात्र, तो बंगालकडून फर्स्टक्लास क्रिकेट खेळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com