WTC Points Table: टीम इंडियाला WTC फायनलचं तिकीट मिळणं कठीण! हे २ संघ शर्यतीत; वाचा संपूर्ण समीकरण

WTC Points Table Scenario: भारतीय संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने ३-१ ने आघाडी घेतली आहे.
how team india can still reach in finals of world test championship final know wtc points table final scenario
how team india can still reach in finals of world test championship final know wtc points table final scenarioyandex
Published On

WTC Final Scenario:

भारतीय संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने ३-१ ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना जिंकून भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी कायम आहे.

मात्र या स्थानी टिकून राहण्यासाठी भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडून कडवी झुंज पाहायला मिळत आहे. यावेळीही भारतीय संघ वर्ल्डटेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होणार का? कसं असेल समीकरण? जाणून घ्या.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेत जर ऑस्ट्रेलियाने २-० ने विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचू शकतो. मात्र हे इतकं सोपं नसणार आहे. कारण ऑस्ट्रेलियाला पहिल्या स्थानी पोहचण्यासाठी भारतीय संघाने धर्मशाळा कसोटीत पराभूत होणं गरजेचं असणार आहे. जर भारतीय संघाने धर्मशाळा कसोटीत विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसेल. (Cricket news marathi)

how team india can still reach in finals of world test championship final know wtc points table final scenario
IND vs ENG 5th Test: धरमशालेत रंगणार भारत- इंग्लंड अंतिम कसोटी सामना! इथे कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत कोणता संघ कितव्या स्थानी?

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या मालिकेत न्यूझीलंडने बाजी मारली तर न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानी पोहचेल. गुणतालिकेत टॉप २ मध्ये असणाऱ्या संघात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना होत असतो. सध्या या यादीत न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानी आहे. तर भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आहे. तर पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणारा ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. यावेळीही भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ३ पैकी २ संघ अंतिम फेरीत दाखल होऊ शकतात.

how team india can still reach in finals of world test championship final know wtc points table final scenario
Rohit Sharma Statement: या खेळाडूंसाठी टीम इंडियाचे दार कायमचे बंद? रोहित शर्माचा मोठा खुलासा

या स्पर्धेतील पहिल्या हंगामात भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसऱ्या हंगामात भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना पार पडला. या सामन्यातही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com