भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना धरमशालेत रंगणार आहे. भारतीय खेळाडूंनी या मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
पुढील तिन्ही सामन्यांमध्ये शानदार विजय मिळवत भारतीय संघाने या मालिकेत ३-१ ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने ही मालिका तर जिंकली आहे. मात्र शेवटचा कसोटी सामना जिंकून भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
भारत- इंग्लंड सामना होणार रद्द?
मालिकेतील शेवटचा सामना भारतीय संघाने गमावला तरीदेखील ही मालिका ३-२ ने नावावर करण्याची संधी असणार आहे. मात्र जर हा सामना जिंकला तर या मालिकेत इंग्लंडचा ४-१ ने लज्जास्पद पराभव करण्याची संधी असणार आहे. दरम्यान ७ मार्चपासून सुरु होणाऱ्या सामन्यापूर्वी धरमशालेतील हवामानाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. माध्यमातील वृ्त्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या सामन्यावेळी धरमशालेत जोरदार पावसासह गारा पडण्याची शक्यता आहे.
कसं असेल हवामान?
माध्यमातील वृत्तांमध्ये असं म्हटलं गेलं आहे की, सामन्याच्या दिवशी धरमशालेतील तापमान ७ डिग्री सेल्सिअस इतकं असेल. तर कमाल तापमान ४ डिग्री सेल्सिअस इतकं असेल. इंग्लिश खेळाडूंना या वातावरणात खेळण्याची सवय आहे. कारण इंग्लंडचं तापमान असंच काहीसं असतं. याचा इंग्लंडला चांगलाच फायदा होणार आहे. मात्र पावसाचं प्रमाण अधिक असल्यास पहिल्या दिवसाचा खेळ रद्द केला जाऊ शकतो. (Cricket news in marathi)
मालिकेतील अंतिम सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान,अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाशदीप.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.