WPL 2024: पेरी अन् मंधानाकडून चौकार- षटकारांचा पाऊस; युपीला नमवत RCB ने उधळला विजयाचा गुलाल

UP Warriors vs Royal Challengers Bangalore: युपी वॉरियर्सला नमवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने स्पर्धेतील तिसरा विजय मिळवला आहे. या विजयासह संघाने गुणतालिकेत तिसऱ्या त्यांनी झेप घेतली आहे.
WPL 2024 royal challengers bangalore beat up warriorz to break loosing streak cricket news marathi
WPL 2024 royal challengers bangalore beat up warriorz to break loosing streak cricket news marathi saam tv news
Published On

WPL 2024, UP Warriorz vs Royal Challengers Bangalore:

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने पुन्हा एकदा विजयाचा गुलाल उधळला आहे. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्यानंतर पुढील दोन सामन्यांमध्ये संघाला पराभवाची चव चाखावी लागली. दरम्यान आता युपी वॉरियर्सला नमवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने स्पर्धेतील तिसरा विजय मिळवला आहे. या विजयासह संघाने गुणतालिकेत तिसऱ्या त्यांनी झेप घेतली आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, युपी वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या स्म्रिती मंधानाने आक्रमक खेळी करत ५० चेंडूत ३ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने ८० धावांची खेळी केली. तर दुसऱ्या बाजूने एलिसा हेलीने हल्लाबोल करत ३८ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५८ धावा चोपल्या.

WPL 2024 royal challengers bangalore beat up warriorz to break loosing streak cricket news marathi
IND vs ENG 5th Test, Weather Update: भारत- इंग्लंड अंतिम कसोटी सामना रद्द होणार? चिंता वाढवणारं कारण आलं समोर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने उभारला १९८ धावांचा डोंगर..

एलिसा हेली स्म्रिती मंधानाच्या खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २० षटक अखेर १९८ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या युपी वॉरियर्सकडून कर्णधार एलिसा हेलीने ३८ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ५५ धावांची खेळी केली. हेलीने आक्रमक सुरुवात करून दिली. मात्र तिला संघातील इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. (Cricket news in marathi)

WPL 2024 royal challengers bangalore beat up warriorz to break loosing streak cricket news marathi
IND vs ENG 5th Test: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! अंतिम कसोटीसाठी इंग्लंडच्या ताफ्यात अश्विनसारख्याच घातक गोलंदाजाची एन्ट्री

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने हा सामना २३ धावांनी जिंकला. या संघाने हंगामाची दमदार सुरुवात करत सलग २ सामने जिंकले. त्यानंतर पुढील २ सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आता ५ पैकी ३ सामने जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com