NZ vs PAK: RCB ने सोडलेल्या खेळाडूने ठोकले १६ षटकार! रेकॉर्ड ब्रेकिंग खेळी करत चोपल्या १३७ धावा

Finn Allen: न्यूझीलंडचा युवा फलंदा फीन अॅलेनने ६२ चेंडूंचा सामना करत १३७ धावांची खेळी केली आहे.
finn allen
finn allensaam tv news

Finn Allen Century Against Pakistan:

पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा २४ वर्षीय फलंदाजाने पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धूलाई केली आहे.

न्यूझीलंडचा युवा फलंदा फीन अॅलेनने ६२ चेंडूंचा सामना करत १३७ धावांची खेळी केली आहे. त्याने मैदानाच्या चारही बाजूंना फटकेबाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांना भरदिवसा चांदण्या दाखवल्या आहेत. १६ षटकारांसह त्याने ५ चौकार देखील मारले आहेत.

पाकिस्तानी गोलंदाजांवर हल्लाबोल..

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात अॅलेनने अवघ्या ४८ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. त्याने जगातील सर्वोत्तम गोलंदाजी अटॅक म्हणवून घेणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

त्याने मोहम्मद वसीमपासून ते शाहीन आफ्रिदी सर्वांच्या गोलंदाजीवर धावांचा पाऊस पाडला. ४ षटकात ६० धावा खर्च करणारा हॅरिस रउफ या सामन्यातील सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. तर संघातील प्रमुख गोलंदाज शाहीन आफ्रिदीने ४ षटकात ४३ धावा केल्या. यासह मोहम्मद नवाजने ४ षटकात ४४ धावा खर्च केल्या. (Latest sports updates)

finn allen
Rohit Sharma Record: एकच नंबर! हिटमॅनने रचला इतिहास; असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

न्यूझीलंडसाठी सर्वात मोठं शतक..

फिन अॅलेन हा टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघासाठी सर्वात वेगवान शतक झळकावणारा तिसराच फलंदाज ठरला आहे. या यादीत ग्लेन फिलिप्स (४६ चेंडू) तर कॉलिन मुनरो (३७ चेंडू) यांचा समावेश आहे. फिन अॅलेनचे हे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरे शतक आहे.

finn allen
Rohit Sharma Statement: 'मी आधीच सांगितलं होतं की...', अफगाणिस्तानला धूळ चारताच रोहित शर्माचं मोठं वक्तव्य

आरसीबीसीने केली मोठी चूक..

काही दिवसांपूर्वीच आयपीएल २०२४ स्पर्धेसाठीचा लिलाव सोहळा पार पडला. या लिलाव सोहळ्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनने फिन अॅलेनला रिलीझ करण्याचा निर्णय घेतला. त्याने आयपीएल २०२३ स्पर्धेत रॉयल चॅलेजंर्स बंगळुरु संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

त्याला ८० लाखांची बोली लावून या संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र या हंगामात त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. दरम्यान आगामी हंगामासाठी झालेल्या लिलावात त्याने आपली मुळ किंमत ७५ लाख रुपये इतकी ठेवली होती. मात्र त्याला एकही खरीददार मिळाला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com