Rohit Sharma Statement: 'मी आधीच सांगितलं होतं की...', अफगाणिस्तानला धूळ चारताच रोहित शर्माचं मोठं वक्तव्य

Rohit Sharma Statement On Team India: भारतीय संघाने अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंचं कौतुक करत मोठं वक्तव्य केलं आहे.
rohit sharma
rohit sharmasaam tv news

Rohit Sharma Latest News In Marathi:

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या टी -२० सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघाने ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानने २० षटक अखेर १७२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने दिलेलं आव्हान १५.४ षटकात पूर्ण केलं. यासह टी -२० मालिकेवर कब्जा केला आहे. दरम्यान सामना झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने मोठं वक्तव्य केलं आहे.

खेळाडूंचं तोंडभरून कौतुक...

या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी १७३ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वाल, अर्शदीप सिंग आणि शिवम दुबेने चमकदार कामगिरी केली. या खेळाडूंची अशी कामगिरी पाहिल्यानंतर खूप अभिमान वाटतो. (Latest sprots News In Marathi)

rohit sharma
IND vs AFG: पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाचे हे ३ स्टार अफगाणिस्तानवर पडू शकतात भारी

रोहित शर्मा म्हणाला की, ' हे खूप सुखद आहे, हा एक मोठा प्रवास आहे. ही प्रवास २००७ मध्ये सुरू झाला होता. आम्हाला काय करायचं आहे हे चित्र आधीच स्पष्ट होतं. मी सर्वांना आधीच सांगितलं होतं की, जर तुम्ही अशी कामगिरी करणार असाल तर नक्कीच तुम्हाला अभिमान वाटेल. प्रत्यक्षात मैदानावर जाऊन अशी कामगिरी करणं अभिमानास्पद आहे.

rohit sharma
IND vs AFG , 1st T20I Weather Update: पाऊस नव्हे तर या कारणामुळे भारत- अफगाणिस्तान सामना होणार रद्द? समोर आलं मोठं कारण

यशस्वी जयस्वालचं केलं कौतुक..

तसेच यशस्वी जयस्वालचं कौतुक करत तो म्हणाला की, ' गेल्या काही वर्षात यशस्वी जयस्वालने दमदार खेळ केला आहे. जयस्वालने कसोटी क्रिकेटसह आता टी -२० क्रिकेटमध्येही दमदार कामगिरी केली आहे. त्याने आपली क्षमता दाखवून दिली आहे.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com