WPL Eliminator : मुंबईची पलटण की युपीचे वॉरियर्स? कोण खेळणार WPL फायनल? पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11

MI VS UP Head to Head: विमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे
MI -W VS UP-W
MI -W VS UP-WTwitter

MI-W VS UP-W: विमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. विजेत्या संघाचा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध होणार आहे.

मुंबई इंडियन्स संघाने सुरुवातीच्या पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. त्यामुळे असे वाटले होते की, मुंबई इंडियन्स अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरेल.

मात्र शेवटच्या ३ पैकी २ सामने गमावल्यानंतर मुंबईला दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. हा सामना आज संध्याकाळी ७:३० वाजता नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर रंगणार आहे.

MI -W VS UP-W
IND VS AUS: टीम इंडियाचा एकच खेळाडू पास! बाकी सर्व नापास...

दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत..

साखळी फेरीतील सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी एकमेकांना हरवलं आहे. पहिल्या सामन्यात मुंबईने एकतर्फी विजय मिळवला होता. (Latest sports updates)

तर दुसऱ्या सामना युपीने सहज जिंकला होता. सलग ५ सामने जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाचा विजयी रथ युपीनेच थांबवला होता.

सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप ५ फलंदाजांच्या यादीत युपीच्या फलंदाजांचा समावेश आहे. ताहलिया मॅकग्राने २९५ तर एलीसा हेलीने २४५ धावा केल्या आहेत. (WPL 2023)

MI -W VS UP-W
IND VS AUS: राडाच ना! भर मैदानात कोहली अन् स्टोइनीस भिडले, 'या 'कारणामुळे आले आमने सामने - VIDEO

अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ११-

मुंबई इंडियन्स: हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (यष्टिरक्षक), नताली सिवर ब्रंट, अमेलिया केर, इसाबेल वोंग, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता आणि सायका इशाक.

यूपी वॉरियर्स: एलिसा हेली (यष्टीरक्षक आणि कर्णधार), श्वेता सेहरावत, देविका वैद्य, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, सिमरन शेख, सोफी एक्लेस्टन, दीप्ती शर्मा, अंजली सरवानी आणि राजेश्वरी गायकवाड.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com