भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना धरमशालेच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंड नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करताना दिसून येणार आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये २ मोठे बदल करण्यात आले आहेत. गेल्या सामन्यातून विश्रांती देण्यात आलेला जसप्रीत बुमराह या सामन्यात कमबॅक करताना दिसून येणार आहे. तर रजत पाटीदार दुखापतीमुळे संघाबाहेर प्लेइंग ११ मधून बाहेर झाला आहे. त्याच्याऐवजी देवदत्त पडीक्कलला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे.
देवदत्त पडीक्कलचं पदार्पण..
या सामन्यासाठी युवा भारतीय फलंदाज देवदत्त पडीक्कलला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. विराट कोहली मालिकेतून बाहेर झाल्यानंतर रजत पाटीदारला संघात स्थान दिलं गेलं होतं. त्यानंतर केएल राहुल संघाबाहेर होताच रजत पाटीदारला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली. मात्र तो या संधीचा फायदा घेऊ शकलेला नाही. गेल्या तिन्ही सामन्यात तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. दरम्यान आता दुखापतीमुळे तो प्लेइंग ११ मधून बाहेर पडला आहे. त्याच्याऐवजी पडीक्कलला कसोटी पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. (Cricket news in marathi)
तसेच हा सामना आर अश्विनसाठीही अतिशय खास असणार आहे. कारण हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना असणार आहे. अश्विनने आतापर्यंत खेळलेल्या ९९ सामन्यांमध्ये ५०७ गडी बाद केले आहेत.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११..
इंग्लंड : जॅक क्रोली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (सी), बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, मार्क वुड शोएब बशीर, जेम्स अँडरसन.
भाारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, सर्फराज खान, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.