WPL Final 2024: 'आता ए साला कप नामदू म्हणायचं...',RCB च्या ऐतिहासिक विजयानंतर स्मृती मंधानाचा फॅन्सला खास मेसेज

Smriti Mandhana Statement News: स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. गेल्या १६ वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाचे फॅन्स जे स्वप्न पाहत होते ते स्वप्न महिला संघाने पूर्ण केलं आहे.
rcb captain smriti mandhana special message for fans after becoming champion of wpl 2024
rcb captain smriti mandhana special message for fans after becoming champion of wpl 2024 twitter

Smriti Mandhana Statement News In Marathi:

स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. गेल्या १६ वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाचे फॅन्स जे स्वप्न पाहत होते ते स्वप्न महिला संघाने पूर्ण केलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाने फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर पुरुष संघातील खेळाडूही महिला संघातील खेळाडूंना पाठींबा देताना दिसून आले. दरम्यान या ऐतिहासिक विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची कर्णधार स्मृती मंधानाने मन जिंकणारे वक्तव्य केलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे फॅन्स सुरुवातीपासूनच 'ए साला कप नामदे' चा नारा देत आहेत. याचा अर्थ असा की, यावर्षी कप आमचाच आहे. तर ऐतिहासिक विजयानंतर स्मृती मंधानाने 'ए साला कप नामदु' असे म्हटले आहे. याचा अर्ध कप आमचा झाला आहे असा होतो.

rcb captain smriti mandhana special message for fans after becoming champion of wpl 2024
IPL 2024: IPL आधीच मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं! संघातील हुकमी एक्का दुखापतग्रस्त

या विजयानंतर ती म्हणाली की,'हे खरंच झालंय यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. भावना शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. मला इतकंच म्हणायचंय की, मला माझ्या संघाचा अभिमान आहे. आम्ही बंगळुरुत शानदार कामगिरी केली. मात्र दिल्लीमध्ये आम्हाला २ पराभवांचा सामना करावा लागला.' (Cricket news in marathi)

rcb captain smriti mandhana special message for fans after becoming champion of wpl 2024
IPL 2024: IPL मिळवून देणार टीम इंडियाचं तिकीट! T-20 WC मध्ये विराटसह या खेळाडूंना संधी मिळणं कठीण

'योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याबाबत आम्ही आधीच चर्चा केली होती. यांसारख्या काही मोठ्या स्पर्धा असतात तेव्हा तुम्हाला योग्यवेळी चांगली कामगिरी करावी लागते. गतवर्षी झालेल्या हंगामातून आम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत.'

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, दिल्ली कॅपिटल्सने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दिल्लीच्या फलंदाजांना हा निर्णय सार्थ ठरवता आला नाही. दिल्लीचा डाव अवघ्या ११३ धावांवर आटोपला. हे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने ३ चेंडू आणि ८ गडी राखून पूर्ण केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com