Delhi Capitals Squad: विजय एकच, पण दिल्ली संघात मोठे बदल; घातक गोलंदाज बाहेर, विस्फोटक फलंदाजाची एन्ट्री

Priyam Garg: लो स्कोरिंग सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने जोरदार कामगिरी करत ४ गडी राखून विजय मिळवला.
delhi capitals
delhi capitals saam tv
Published On

Kamlesh Nagarkoti Replacement: गुरुवारी आयपीएल २०२३ स्पर्धेत एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

या लो स्कोरिंग सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने जोरदार कामगिरी करत ४ गडी राखून विजय मिळवला. दरम्यान या विजयानंतर दिल्लीच्या ताफ्यात एक मोठा बदल करण्यात आला आहे.

delhi capitals
IPL 2023 : IPL सुरू असतानाच विराट, रोहित अन् धोनीला मोठा धक्का, असं घडलं तरी काय?

आयपीएल २०२३ स्पर्धेच्या उर्वरीत हंगामासाठी प्रियम गर्गची दिल्लीच्या संघात निवड करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी बाहेर झाल्यामुळे प्रियम गर्गला दिल्लीच्या संघात संधी दिली गेली आहे. दुखापतीमुळे कमलेश नागरकोटीला एकही सामना खेळता आला नव्हता.

अखेर तो आयपीएल २०२३ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. Priyam Garg आणि बंगाल संघाचा कर्णधार अभिमन्यु ईश्वरणला ट्रायलसाठी बोलावण्यात आले होते. स्पोर्ट्सकीडाच्या वृत्तानुसार, मंगळवारी या दोघांना ट्रायलसाठी बोलावण्यात आले होते.

मध्यक्रम आणखी मजबूत करण्यासाठी प्रियम गर्गची रिप्लेसमेंट निवड केली गेली आहे. याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे. यापूर्वी प्रियम गर्गने सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व केले आहे. (Change In Delhi Capitals Squad)

प्रियम गर्गकडे आयपीएलचे ३ हंगाम खेळण्याचा अनुभव आहे. इतकेच नव्हे तर त्याने २०२० मध्ये झालेल्या आयसीसी अंडर १९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.

या स्पर्धेतील कामगिरी पाहता त्याची आयपीएल स्पर्धेत निवड झाली होती. हैदराबाद संघाने १.९० कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. मात्र या हंगामात त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. (Latest sports updates)

delhi capitals
Virat Kohli Record: कोहलीचा ‘विराट’ कारनामा! आजपर्यंत IPL स्पर्धेत कोणत्याच फलंदाजाला न जमलेला विक्रम केला नावावर

प्रियम गर्गच्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायच झालं तर त्याने आतापर्यंत १७ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १५.२९ च्या सरासरीने २५१ धावा केल्या आहेत.

सलग ३ सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर हैदराबाद संघाने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. या वर्षी झालेल्या लिलावात त्याला कुठल्याच संघात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. अखेर रिप्लेसमेंट म्हणून त्याला संधी दिली गेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com