आगामी आयपीएल स्पर्धेत हार्दिक पंड्या हा मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यात मुंबईच्या खेळाडूंसह संघमालकीन नीता अंबानी आणि मेंटोर सचिन तेंडुलकर असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्याने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मामध्ये अंतर ठेवण्यात आलं आहे. हा फोटो व्हायरल होताच चर्चेला उधाण आलं आहे.
हार्दिक पंड्याला कर्णधार बनवण्यावरुन मुंबईचे फॅन्स नाराज असल्याचं पाहायला मिळालं आहे. आता हा फोटो व्हायरल होताच भलत्याच चर्चा सुरु झाल्या आहेत. हार्दिकला जेव्हा पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी तो म्हणाला की, 'सर्वप्रथम सांगायचं झालं तर, काहीच वेगळं नसेल. मला त्याच्याकडून मदतीची गरज असेल तर तो नक्कीच मला मदत करेल. तो भारतीय संघाचा कर्णधार आहे. याचा मला नक्कीच फायदा होणार आहे. त्याने मुंबई इंडियन्स संघासाठी खूप केलं आहे. मी त्याचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आलो आहे. त्यामुळे मला वाटत नाही की, काही वेगळं असेल.आम्ही १० वर्षांपासून एकत्र खेळतोय. मी माझी संपूर्ण कारकिर्द त्याच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे .त्यामुळे नक्कीच त्याचा हात माझ्या खांद्यावर असेलच.'
मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मुंबईच्या खेळाडूंचा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या दोघेही सोफ्यावर बसले आहेत. तर इतर खेळाडू बाजूला आणि मागे उभे आहेत. या पोस्टवर नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Cricket news in marathi)
सोशल मीडियावर हार्दिक पंड्याला ट्रोल केलं जात आहे. एका युजरने तर हार्दिक पंड्याला मुंबई कुटुंबातील साप असं म्हटलं आहे. तर काहींचं म्हणणं आहे की, हार्दिक पंड्याने कर्णधारपद सोडायला हवं. त्याने स्वत:हून रोहितकडे कर्णधारपद दिलं पाहिजे. तर अनेकांना एकच प्रश्न पडला आहे, तो म्हणजे दोघेही इतके लांब का बसले आहेत.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.