Ridhima Pathak News : मॉडेल रिद्धिमा पाठकसह तिच्या भावाविरोधात फसवणुकीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय ?

Ridhima Pathak News : टीव्ही अभिनेत्री रिद्धिमा पाठक आणि तिच्या भावाविरोधात एका ऑस्ट्रेलियाच्या कंपनीने गुन्हा दाखल केलेला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Ridhima Pathak News : मॉडेल रिद्धिमा पाठकसह तिच्या भावाविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय ?
Ridhima Pathak NewsSaam Tv

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री रिद्धिमा पाठकसंबंधित एक महत्वाची बातमी समोर येत आहे. टीव्ही अभिनेत्री रिद्धिमा पाठक आणि तिच्या भावाविरोधात एका ऑस्ट्रेलियाच्या कंपनीने गुन्हा दाखल केलेला आहे. अभिनेत्री आणि तिच्या भावाविरोधात ऑस्ट्रेलियाच्या एस्टिमेट इलेक्ट्रिकल कंपनीने नागपूर सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे.

Ridhima Pathak News : मॉडेल रिद्धिमा पाठकसह तिच्या भावाविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय ?
Kalki 2898 AD चा बॉक्स ऑफिसवर धमाका; दोन दिवसातच पार केला १०० कोटींचा टप्पा

रिद्धिमा पाठक आणि तिचा भाऊ इशान पाठक यांची पुण्यामध्ये स्वत:च्या मालकीची कंपनी आहे. तिच्या कंपनीचं नाव रिस्विच असं असून ती एक इंटरनॅशनल कंपनी आहे. अभिनेत्री आणि तिच्या भावावर बनावट बिलं तयार करुन एस्टिमेट इलेक्ट्रिकल कंपनीकडून जास्त रक्कम उकळल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. ऑस्ट्रेलियन कंपनीने नागपूरच्या सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

Ridhima Pathak News : मॉडेल रिद्धिमा पाठकसह तिच्या भावाविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय ?
Sushmita Sen Changed DOB : सुष्मिता सेनची जन्म तारीखच बदलली, चाहते पडले विचारात, नेमकं काय झालं?

केलेल्या तक्रारीनंतर आणि न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांकडून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु अभिनेत्रीला आणि तिच्या भावाला अटक करण्यात आलेली नाही. नागपूर सायबर पोलिसांकडून अभिनेत्रीवर कलम ४०६, ४२० आणि ४६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रिद्धिमा पाठक एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री असून ती आयपीएलमध्ये होस्टिंगही करते.

Ridhima Pathak News : मॉडेल रिद्धिमा पाठकसह तिच्या भावाविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय ?
Sonu Nigam Asha Bhosle News : भरकार्यक्रमात सोनू निगमने आधी आशा भोसलेंचा पाय घुतले, नंतर माथा टेकून पडला पाया; VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com