जगविख्यात ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसले (Asha Bhosle) यांच्यावरील ९० मान्यवरांनी लिहिलेल्या ९० लेखांचे आणि दुर्मिळ फोटोंचे 'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकाचे आज प्रकाशन करण्यात आले. हा पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले येथे पार पडला. पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमही उपस्थित होता. यावेळी गायक सोनूने भरमंचावर स्वरसम्राज्ञी आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे पाय गुलाब पाण्याने धुत पाद्य पूजन केले.
सध्या सोशल मीडियावर सोनू निगम गायिका आशा भोसले यांचे पाय धुत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पुस्तक प्रकाशनानंतर सोनूने आपली प्रतिक्रियाही दिली. तो म्हणाला की, " जर तुम्हाला गाण्याबद्दल कोणत्याही गोष्टी शिकायच्या असतील तर त्या गोष्टी सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. मात्र आम्ही आमच्या काळात आशाजी आणि लताजी यांच्यांकडून गाणे शिकलो. तुम्ही शिकवलेल्या गोष्टींचा आजही मी आदर करतो. आजही आम्ही तुमच्याकडून गाणं शिकतो."
" हिंदू आणि सनातन धर्मात गुरूला विशेष स्थान आहे. तुम्ही आमच्यासाठी देवा समान आहात. मी कायमच तुमचा सन्मान करतो."यावेळी सोनू निगमने पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी भरमंचावर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे पाय धुत पाद्य पूजन केले. यावेळी मंचावर मंत्रोच्चार सुरू होता. पुस्तक प्रकाशन सोहळ्याला, ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, गायिका उषा मंगेशकर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर सह आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.