Bigg Boss OTT 3 : अरमान मलिक आणि वडा पाव गर्ल बिग बॉसच्या घराबाहेर पडणार?, दुसऱ्या एलिमिनेशन राऊंडमध्ये ७ स्पर्धक

Bigg Boss OTT 3 2nd Elimination Round : 'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या पर्वाला गेल्या काही दिवसांपूर्वीच सुरूवात झालेली आहे. नुकतंच दुसऱ्या नॉमिनेशन टास्कची घोषणा करण्यात आली आहे.
Bigg Boss OTT 3 2nd Elimination Round
Bigg Boss OTT 3 2nd Elimination RoundSaam Tv

'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या पर्वाला गेल्या काही दिवसांपूर्वीच सुरूवात झालेली आहे. सध्या सर्वत्र 'बिग बॉस ओटीटी ३'ची जोरदार चर्चा सुरू आहे. 'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या पर्वातलं दुसऱ्या नॉमिनेशन टास्कची घोषणा करण्यात आली आहे. या टास्कमध्ये बिग बॉसने एक दोन नाही तर ७ स्पर्धकांना नॉमिनेट केलं आहे. यामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धकांच्या नावांचा समावेश आहे. लवकरच या स्पर्धकांचा एलिमिनेशन राऊंड पार पडणार असून कोणता स्पर्धक बाहेर पडणार यांची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Bigg Boss OTT 3 2nd Elimination Round
Hina Khan Breast Cancer : अभिनेत्री हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान, पोस्ट करत स्वत:च चाहत्यांना दिली हेल्थ अपडेट

बिग बॉसने ७ स्पर्धक नॉमिनेट केले आहेत. त्यामध्ये वडा पाव गर्ल चंद्रिका गेरा दीक्षित, युट्यूबर अरमान मलिक आणि त्याची पहिली पत्नी पायल मलिक, सिंगर सना सुलतान, सोशल मीडिया एन्फ्लूएंसर लव कटारिया, टेलिव्हिजन अभिनेता साई केतन राव आणि कानपूरची शिवानी कुमारच्या नावाचा यामध्ये समावेश आहे. 'बिग बॉस ओटीटी ३'मध्ये, शोच्या पहिल्याच आठवड्यात दोन नॉमिनेशन टास्क झाले होते. त्यातील एका टास्कमध्ये, 'एजंट' बनलेल्या सना सुलतानाने नीरज गोयत आणि शिवानी कुमारी यांना नॉमिनेट केलं होतं. पहिल्या नॉमिनेशन राऊंडमध्ये व्होट्स कमी मिळाल्यामुळे नीरज गोयतला घराबाहेर जावे लागले.

तर आता दुसऱ्या नॉमिनेशन राऊंडसाठीही सना सुलतानाला बिग बॉसने काही खास अधिकार दिले आहेत. नॉमिनेशन टास्क अंतर्गत सनाने युट्युबर अरमान मलिक, त्याची पहिली पत्नी पायल मलिक आणि वडा पाव गर्ल चंद्रिका गेरा दीक्षित यांच्याकडून नॉमिनेशन टास्कमध्ये कोणत्याही स्पर्धकाला नॉमिनेट करण्याचा अधिकार काढून घेतला होता. हे सातही स्पर्धकांना बिग बॉसने घरातल्या कामामुळे आणि होणाऱ्या वादामुळे नॉमिनेट केले आहे. अनेकदा या सर्व स्पर्धकांमध्ये कामामुळे वाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला आहे. येत्या शनिवारी बिग बॉस कोणत्या स्पर्धकाला घरचा रस्ता दाखवतात ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Bigg Boss OTT 3 2nd Elimination Round
Aamir Khan Buys New Apartment : अबब... मिस्टर परफेक्शनिस्टने मुंबईत खरेदी केला ९ कोटींचा फ्लॅट, आमिर खानची संपत्ती माहितीये का ?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com