Bigg Boss 17
Bigg Boss 17Saam Tv

Bigg Boss 17: एकमेकांच्या चेहऱ्यावर कॉफी फेकून केलं नॉमिनेट, बिग बॉसच्या घरातील तुमचा आवडता स्पर्धक नॉमिनेशन लिस्टमध्ये

Bigg Boss 17 Nomination Task: यावेळेची नॉमिनेशनची प्रक्रियाच जरा हटके होती. पण यापेक्षा जे स्पर्धक नॉमिनेट झाले ते पाहून प्रेक्षक आश्चर्यचकीत झाले. यावेळी बिग बॉसच्या घरातील ८ सदस्य नॉमिनेट झाले.

Bigg Boss 17 Promo:

'बग बॉस १७' ला (Bigg Boss 17) सध्या प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. घरातील सर्व सदस्य प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहेत. दिवसेंदिवस बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमधील वाद आणि भांडणं वाढत चालली आहेत. अशामध्ये सोमवारचा एपिसोड खूपच मनोरंजक आणि आश्चर्यचकित करणारा होता. बिग बॉसने अचानक घरातील सर्व सिस्टम बंद केले आणि स्पर्धकांना लिविंग रूममध्ये राहण्यास सांगितले. त्यानंतर घरातील सर्व सदस्यांना एक्टिविटी एरियामध्ये नॉमिनेशनच्या (Bigg Boss 17 Nomination Task) प्रक्रियेसाठी बोलावले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळेची नॉमिनेशनची प्रक्रियाच जरा हटके होती. पण यापेक्षा जे स्पर्धक नॉमिनेट झाले ते पाहून प्रेक्षक आश्चर्यचकीत झाले. यावेळी बिग बॉसच्या घरातील ८ सदस्य नॉमिनेट झाले. यामधील एक स्पर्धक असा आहे जो आजपर्यंत कधीच नॉमिनेट झाला नव्हता. या स्पर्धकाच्या नॉमिनेशनमुळे सर्वांनाच धक्का बसला. यावेळी एकमेकांच्या अंगावर कॉफी फेकून नॉमिनेट करण्यात आले.

नुकताच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, या आठवड्यात नामांकन प्रक्रियेसाठी स्पर्धकांचे बिग बॉस कॅफेमध्ये स्वागत करण्यात आले. येथे स्पर्धकांची नावे एक-एक करून पुकारण्यात आली. या स्पर्धकाला कारणे देऊन नॉमिनेट करावे असे बिग बॉसने सांगितले. पण अनोखी गोष्ट अशी होती की, ज्या स्पर्धकाचे नाव घेतलं जाईल त्याला नॉमिनेट करताना दुसऱ्या स्पर्धकाने त्याच्या अंगावर कॉफी फेकून नॉमिनेट करावे असे बिग बॉसने सांगितले.

Bigg Boss 17
Randeep-Lin Wedding Reception: रणदीप-लिनच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी ‘या’ दिवशी होणार, तारीख आली समोर

या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये काही स्पर्धकांनी सन्मानपूर्वक हा टास्क पूर्ण केला. तर काहींनी अतिशय निर्दयीपणे स्पर्धकांच्या चेहऱ्यावर कॉफी फेकली. तीन किंवा अधिक मते मिळविणाऱ्या स्पर्धकाचे या आठवड्याच्या नॉमिनेशन लिस्टमध्ये नाव आले आहे. या आठवड्यात अनेक स्पर्धकांना नॉमिनेशनसाठी नामांकन देण्यात आले. काही नावे अपेक्षित आहेत तर काही आश्चर्यकारक आहेत.

Bigg Boss 17
Parineeti Chopra ने जंकफूड खाऊन वजन का वाढलं?, आता कमी करण्यासाठी जिममध्ये करतेय मेहनत, VIDEO व्हायरल

या आठवड्यात नॉमिनेट स्पर्धकांच्या यादीमध्ये नील भट्ट, मुनव्वर फारुकी, अनुराग डोभाल, सना रईस खान, अभिषेक कुमार, खानजादी, विकी जैन आणि अरुण मैशेट्टी यांचा समावेश आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बिग बॉसच्या घरातील मुनव्वर फारुकीचे नाव नॉमिनेशन लिस्टमध्ये आले आहे. जवळपास सात आठवड्यानंतर मुनव्वरला नॉमिनेट करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. आता नेमकं या आठवड्यामध्ये घराबाहेर कोण जाणार? हे विकेंड का वारमधून स्पष्ट होईल.

Bigg Boss 17
Madhuri Dixit Latest Movie: माधुरी दीक्षितचे निर्मिती क्षेत्रात पाऊल, नव्या चित्रपटाचा पोस्टर रिलीज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com