Bigg Boss Marathi Update: 'बिग बॉस मराठी' हा कार्यक्रम दिवसेंदिवस अजून मनोरंजक होत आहे. काल झालेल्या भागात महेश मांजरेकर यांनी सर्व स्पर्धकांची शाळा घेतली. शनिवारी रविवारी होणाऱ्या चावडीमुळे स्पर्धकांना त्यांची गाडी रुळावर आणण्यासाठी मदत होते. चावडीनंतर स्पर्धकांचा खेळ बदलतो. आज बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन कार्य पार पडणार आहेत.
'बिग बॉस'च्या घरामध्ये काल अनेक गोष्टी बदलल्या आहेत. फायटर योगेश सावंत याला घर सोडून जावे लागले. तर घरामध्ये नवीन स्पर्धकाची एन्ट्री सुद्धा झाली. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील 'सोयराबाई साहेब' ही भूमिका साकारलेली अभिनेत्री स्नेहलता वसईकरने 'बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री केली आहे. स्नेहलताच्या येण्याने घरात काय बदल होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. (Actress)
कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये 'बिग बॉस'नी घरातील सदस्यांना एक नॉमिनेशन कार्य दिले आहे. विष-अमृत असे या कार्याचे नाव आहे. बिग बॉस यांनी जाहीर केले, 'जो सदस्य पेटारा उघडून त्यातील विष मिळवेल, विरोधी टीममधील कोणत्या सदस्याला नॉमिनेट करायचे ते तो ठरवले'. बघुया यात कोणती टीम बाजी मारणार? आणि कोणते सदस्य नॉमिनेट होणार. (Bigg Boss Marathi)
नॉमिनेशन कार्यादरम्यान दोन्ही टीममध्ये चांगलीच जुंपणार आहे. विकास, किरण माने, आणि रोहित शिंदे यांच्यात झटपट चालू आहे तर दुसरीकडे प्रसाद, अक्षय आणि यशश्री लढत आहेत. यात स्नेहलताची सुद्धा भर पडली आहे. ती कोणत्या टीममध्ये जाते, याकडे सर्वांच्या नजर लागल्या आहेत. आज होणाऱ्या या नॉमिनेशनपासून आपल्या टीममधील सदस्यांना वाचविण्यासाठी सगळेजण पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहेत. (TV)
'बिग बॉस मराठी 4'च्या घरातून कोण कोणाला नॉमिनेशन मिळणार, कोणत्या टीम हा टास्क जिंकण्यात यशस्वी ठरणार यावर सगळ्यांची नजर असणार आहे. तसेच अक्षय केळकर हा घरातील नवीन कॅप्टन कसे निर्णय घेतो, यावरही सगळ्यांचे लक्ष असणार आहे. 'बिग बॉस'च्या घरात कोणती टीम बाजी मारणार आणि कोणाला नॉमिनेशनचा सामना करावा हे आपल्याला येणाऱ्या भागात कळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.