Sonu Nigam Trolling : गायक सोनू निगम नेटकऱ्यांवर भडकला, अयोध्येवरील 'त्या' पोस्टवरून चांगलंच सुनावलं

Sonu Nigam Interview : निवडणूकीमध्ये भाजपला कमी जागा मिळाल्यामुळे गायक सोनू निगमच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या एका वकिलाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर सोनूला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या ट्रोलिंगवर सोनूने आता स्पष्टीकरण दिले आहे.
Sonu Nigam Trolling : गायक सोनू निगम नेटकऱ्यांवर भडकला, अयोध्येवरील 'त्या' पोस्टवरून चांगलंच सुनावलं
Sonu NigamSaamtv

लोकसभा निवडणुकीचा मंगळवारी निकाल जाहीर झाला. या लोकसभा निवडणुकीत एनडीएने २९४ जागा जिंकल्या. तर इंडिया आघाडीने २३१ जागा जिंकल्या. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या जागेत घट झाल्याचे दिसून आलं. उत्तर प्रदेशमध्येही भाजपला फार मोठा धक्का बसला आहे. अयोध्या नगरी असलेल्या उत्तर प्रदेशमधील फैजाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपला पराभवाला सामोरे जावं लागलं. निवडणूकीमध्ये भाजप कमी जागा मिळाल्यामुळे गायक सोनू निगमच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या एका वकिलाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर सोनूला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केले होते. या ट्रोलिंगवर सोनूने आता स्पष्टीकरण दिले आहे.

Sonu Nigam Trolling : गायक सोनू निगम नेटकऱ्यांवर भडकला, अयोध्येवरील 'त्या' पोस्टवरून चांगलंच सुनावलं
Kiran Mane Post : "२ मिस्ड कॉल, 'जय महाराष्ट्र'चा मेसेज अन् फोनवरून संवाद"; किरण माने-उद्धव ठाकरेंमध्ये नेमकं काय बोलणं झालं?

हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनूने नेटकऱ्यांना उत्तर दिले आहे. मुलाखतीमध्ये तो म्हणतो, "मला आश्चर्य वाटतं की अनेक वृत्तवाहिन्यांनी त्या व्यक्तीला माझ्यासाठी चुकीचं ठरवलं. त्यांनी त्याच्या अकाऊंटचं तपशील वाचून त्या व्यक्तीची विचारधारा का तपासली नाही? त्या व्यक्तीने त्याच्या बायोमध्ये, सोनू निगम सिंग असं लिहिलं असून पुढे तो फौजदारी वकील असल्याचंही ते म्हणाले आहेत. हे फार चुकीचं आहे. मी सात वर्षांपूर्वीच ट्वीटर वापरणं सोडून दिलेलं आहे."

Sonu Nigam Singh
Sonu Nigam Viral PostX Post

तो पुढे मुलाखतीमध्ये म्हणाला, "नेहमीच लक्षात राहु द्या मी कोणतीही खळबळजनक राजकीय टिप्पणी करत नाही. मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करतो. मात्र ही घटना माझ्यासाठीच नाही तर माझ्या कुटुंबासाठीही चिंताजनक आहे." यावेळी बिहारच्या क्रिमिनल लॉयरच्या X पोस्टचे अनेक माझे चाहते मला स्क्रिनशॉट शेअर करीत आहेत, असं स्वत: सोनू निगम म्हणाला. पुढे सोनू निगम म्हणाला, " माझ्या टीमने त्या वकिलांची भेट घेतली आहे. त्यांनी त्यांच्याकडे त्यांचं X वरील युजरनेम बदलण्याची विनंती केली आहे. जेणेकरून लोकांमध्ये कन्फ्यूजन होणार नाही."

Sonu Nigam Trolling : गायक सोनू निगम नेटकऱ्यांवर भडकला, अयोध्येवरील 'त्या' पोस्टवरून चांगलंच सुनावलं
Nivedita Saraf Birthday : वयाच्या ५व्या वर्षापासून सुरूवात करणाऱ्या निवेदिता सराफ यांचा सिनेसृष्टीतला प्रवास दिमाखात, वाचा फिल्मी करियरबद्दल

उत्तर प्रदेशातील फैजाबादमध्ये समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने भाजपच्या उमेदवाराला पराभूत केले. त्यानंतर 'सोनू निगम सिंह' या नावाच्या युजरने एक्स मीडियावर फैजाबादमधील भाजपच्या पराभवाविषयी पोस्ट केली.

या पोस्टमध्ये त्याने लिहिले होते की, "ज्या सरकारने तब्बल ५०० वर्षांनी संपूर्ण अयोध्या उजळून टाकली. या शहरात विमानतळ, रेल्वे स्टेशन सुरु केले. पक्षाने चांगलं मंदिर, अर्थव्यवस्था बनवली. त्याच पक्षाचा अयोध्येमध्ये पराभव. अयोध्येवासीयांसाठी ही लाजीरवाणी बाब आहे." या पोस्टनंतर अनेक नेटकऱ्यांना ही पोस्ट गायक सोनू निगमची असल्याचा गैरसमज झाला. त्यानंतर नेटकऱ्यांनी गायक सोनू निगमलाच ट्रोल केले. दरम्यान, गायक सोनू निगमला याआधी देखील ट्रोलिंग सहन करावी लागली.

Sonu Nigam Trolling : गायक सोनू निगम नेटकऱ्यांवर भडकला, अयोध्येवरील 'त्या' पोस्टवरून चांगलंच सुनावलं
Faisal Malik On Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्यासमोर खरं बोलणं पडलं महागात, 'पंचायत'च्या प्रल्हादला गमवावी लागली होती नोकरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com