सध्या जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि फैजल मलिक स्टारर 'पंचायत ३' वेबसीरीज कमालीची चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी 'ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ'वर रिलीज झालेल्या ह्या वेबसीरीजला चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. सध्या ह्या वेबसीरीजची स्टारकास्ट प्रमोशनमध्ये व्यग्र असून वेगवेगळ्या पोर्टलला मुलाखती देताना दिसत आहेत. नुकतीच अभिनेता फैजल मलिक ह्याने एक मुलाखत दिली आहे, त्या मुलाखतीमध्ये त्याने "बिग बी बच्चन यांच्यासोबत खरं बोलल्यामुळे मला नोकरी गमवावी लागली." असं विधान केलं आहे. सध्या अभिनेत्याच्या ह्या विधानाची जोरदार चर्चा होत आहे.
लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने सांगितले की, "एकदा मी शोच्या निमित्ताने दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत अमिताभ बच्चन यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांना भेटण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. त्यांना पाहिल्यावर मी माझं काम विसरून गेलो होतो. आवडता सेलिब्रिटी समोर उभा आहे, म्हटल्यावर मी त्यांच्याकडे ऑटोग्राफ मागितला. जेव्हा बिग बींच्या घरी जातो त्यावेळी आपल्याला खूप खायला मिळतं. एक प्लेट संपतेय ना संपतेय तिच लगेच दुसरी प्लेट समोर यायची."
"मी त्यांना माझ्याविषयी सांगितले. मग ते माझ्यासोबत बोलू लागले. त्यांनी आम्हाला तिळाचे लाडू खाणार का विचारले. मला वाटलेलं ते आपल्या वयोमानानुसार जास्त गोड पदार्थ खात नसतील. पण त्यांनी मी लाडू हातात घेण्यापूर्वीच दोन लाडू स्वत: खाल्ले. मी विचार केला की ते आपल्या वयाबद्दल खोटं असतील, पण ते खरंच आजही तरुण आहेत."
बिग बी यांच्यासोबतच्या शुटिंग दरम्यानचा किस्साही अभिनेत्याने शेअर केला, तो म्हणाला, "मी त्यांच्या हातात १२० पानांची स्क्रिप्ट दिली होती. त्यांनी ती अवघ्या काही वेळातच पाठांतर केली. पुन्हा त्यांनी तिच्याकडे साधं पाहिलंही नाही."
शुटिंग दरम्यानचा किस्सा सांगताना फैजलने पुढे सांगितले की, " त्यांचं पाठांतर झाल्यानंतर त्यांनी मला आता शुटिंग केव्हा करायची असं विचारलं ? त्यावेळी त्यांना मी प्रामाणिकपणे सर, आता नाही सहा महिन्यानंतर आपल्याला शुटिंग करायची आहे. यानंतर जेव्हा आमची मीटिंग संपली त्यावेळी बिग बी मला, "तु या प्रोजेक्टमध्ये काम नाही करणार, तु हा प्रोजेक्ट सोडून दे" असं बोलले. मी त्यांच्यासोबत खरं बोलल्यामुळे मला नोकरी गमवावी लागली होती."
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.