Happy Birthday Neha Kakkar : घरातूनच मिळाले गायनाचे बाळकडू, ज्या शोमधून बाहेर काढलं त्याची झाली जज; असा आहे नेहा कक्करचा जीवनप्रवास

Neha Kakkar Struggle Story : बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिचा आज (६ जून) ३६वा वाढदिवस आहे. उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये ६ जून १९८८ रोजी नेहाचा जन्म झालेला आहे.
Happy Birthday Neha Kakkar : घरातूनच मिळाले गायनाचे बाळकडू, ज्या शोमधून बाहेर काढलं त्याची झाली जज; असा आहे नेहा कक्करचा जीवनप्रवास
Neha Kakkar BirthdaySaam Tv

बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिचा आज (६ जून) ३६वा वाढदिवस आहे. उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये ६ जून १९८८ रोजी नेहाचा जन्म झालेला आहे. नेहाने आपल्या गाण्यांच्या माध्यामतून आणि आपल्या आवाजाच्या माध्यमातून तिने चाहत्यांवर मोहिनी पसरवली आहे. पंजाबी इंडस्ट्रीपासून ते हिंदी सिनेसृष्टीपर्यंत नेहाने अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. नेहाला काही वेगळ्या ओळखीची गरज नाही. एक प्रसिद्ध गायिका होण्यासाठी तिने विशेष मेहनत घेतली आहे. जाणून घेऊया नेहा कक्करविषयी...

Happy Birthday Neha Kakkar : घरातूनच मिळाले गायनाचे बाळकडू, ज्या शोमधून बाहेर काढलं त्याची झाली जज; असा आहे नेहा कक्करचा जीवनप्रवास
Deepika Padukone: दीपिका रणवीरसह सहकुटुंब गेली डिनर डेटला; बेबी बंपने वेधलं लक्ष

नेहाने बालपणी खूपच संघर्ष केला आहे. देवीच्या जागरणामध्ये नेहा गाणे गायची. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी नेहाने तिच्या वडिलांसोबत जागरणामध्ये गाणे गायला सुरुवात केली. ज्यावेळी हातात वह्या, पुस्तक आणि पेन्सिल घ्यायची त्यावेळी नेहाने हातात माईक घेतला. तिने बालपणापासूनच आपल्या वडिलांना घर चालवण्यासाठी मदत करायला सुरूवात केली. नेहासह तिचे भावंडही देवीच्या जागरणामध्ये गाणे गायचे. आदल्या दिवशी रात्री जागरणामध्ये गाणे गायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरी यायचे. नेहाचं अख्खं बालपण ऋषिकेशमध्ये गेले आहे. ऋषिकेशमध्ये सोनूसोबत तिचे आई- वडील आणि भाऊ सोनू आणि टोनी कक्कर यांच्यासोबत राहत होती

नेहा कक्कर पहिल्यांदा ‘इंडियन आयडॉल २’मध्ये दिसली होते. पण तिला जज अनु मलिक यांनी शोमध्ये नाकारले होते. पण, यानंतरही तिने आपले गाणे सुरू ठेवले. तिच्या आवाजाच्या जोरावर नेहाने विशेष लोकप्रियता मिळवली. ज्या शोमध्ये तिला नाकारले त्या शोच्याच आगामी सीझनची जज झाली आहे. नेहाने ‘मीराबाई नॉट आऊट’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूड डेब्यू केले आहे. नेहा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीमध्येही प्रसिद्ध आहे. नेहाने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणे गायले आहेत. तिने आपल्या आवाजाच्या माध्यमातून विशेष प्रसिद्धी मिळवली आहे.

Happy Birthday Neha Kakkar : घरातूनच मिळाले गायनाचे बाळकडू, ज्या शोमधून बाहेर काढलं त्याची झाली जज; असा आहे नेहा कक्करचा जीवनप्रवास
Shahid kapoor: शाहिदच्या लेकीने बनवलाय आईसाठी खास पदार्थ; मीरा फोटो शेअर करत म्हणाली,माझ्या लाडक्या लेकीने...

सोशल मीडियासह सर्वत्र आपल्या आवाजाने प्रसिद्ध असलेली नेहा आज कोट्यवधींचा मालकीण आहे. नेहाला अलिशान कार्सची प्रचंड आवड आहे. तिच्याकडे BMW, Mercedez Benz, Audi, Range Rover सह अनेक तिच्याकडे अलिशान कार्स आहेत. नेहाने २०२० मध्ये, बॉयफ्रेंड रोहनप्रीत सिंहसोबत लग्न केले आहे.

Happy Birthday Neha Kakkar : घरातूनच मिळाले गायनाचे बाळकडू, ज्या शोमधून बाहेर काढलं त्याची झाली जज; असा आहे नेहा कक्करचा जीवनप्रवास
Singer Sonu Nigam : अयोध्येवरील 'ती' पोस्ट; गायक 'सोनू निगम' ट्रोल, काय आहे नेमक प्रकरण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com