Singer Sonu Nigam : अयोध्येवरील 'ती' पोस्ट; गायक 'सोनू निगम' ट्रोल, काय आहे नेमक प्रकरण?

Singer Sonu Nigam Trolled: देशभरात काल लोकसभेचा निकाल जाहीर झाला. त्यात अयोध्येत भाजपचा पराभव झाला आहे. भाजपचा पराभव झाल्याने सोनू निगमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.
Singer Sonu Nigam
Sonu NigamSaamtv

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या लोकसभा निवडणुकीत एनडीएने २९४ जागा जिंकल्या. तर इंडिया आघाडीने २३१ जागा जिंकल्या. या निवडणुकीत भाजपच्या जागेत घट झाल्याचे दिसून आलं. उत्तर प्रदेशमध्येही भाजपला मोठा धक्का बसला. अयोध्या नगरी असलेल्या उत्तर प्रदेशमधील फैजाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपला पराभवाला सामोरे जावं लागलं. याचदरम्यान, निकालाच्या दिवशी सोनू निगमच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या एका वकिलाची पोस्ट व्हायरल झाली. त्यानंतर नेटकऱ्यांनी गायक सोनू निगमलाच ट्रोल केलं.

सोनू निगमने फैजाबादच्या जागेवर भाष्य केलं नसतानाही, त्याच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली. एक्स मीडियावर निकालाच्या दिवशी सोनू निगम नावाच्या वकिलाची पोस्ट व्हायरल झाली. त्यानंतर नेटकऱ्यांनी गायक सोनू निगम समजून त्याला ट्रोल केले.

पोस्ट काय होती?

उत्तर प्रदेशातील फैजाबादमध्ये समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने भाजपच्या उमेदवाराला पराभूत केले. त्यानंतर 'सोनू निगम सिंह' या नावाच्या युजरने एक्स मीडियावर फैजाबादमधील भाजपच्या पराभवाविषयी पोस्ट केली.

या पोस्टमध्ये त्याने लिहिले होते की, 'ज्या सरकारने तब्बल ५०० वर्षांनी संपूर्ण अयोध्या उजळून टाकली. या शहरात विमानतळ, रेल्वे स्टेशन सुरु केले. पक्षाने चांगलं मंदिर, अर्थव्यवस्था बनवली. त्याच पक्षाचा अयोध्येमध्ये पराभव. अयोध्येवासीयांसाठी ही लाजीरवाणी बाब आहे'. या पोस्टनंतर अनेक नेटकऱ्यांना ही पोस्ट गायक सोनू निगमची असल्याचा गैरसमज झाला. त्यानंतर नेटकऱ्यांनी गायक सोनू निगमलाच ट्रोल केले. दरम्यान, गायक सोनू निगमला याआधी देखील ट्रोलिंग सहन करावी लागली आहे.

Singer Sonu Nigam
Duniyadari Movie: 'दुनियादारी'चा सिक्वेल येतोय?, ११ वर्षांनंतर अंकुश, स्वप्नील आणि सईची मैत्री पाहायला मिळणार

नेटकऱ्यांची सोनू निगमवर टीका

नेटकऱ्यांनी गैरसमजातून सोनू निगमला ट्रोल केले. अनेकांनी त्याला गाणे न गाण्याचा सल्ला दिला. एकाने म्हटलं की, 'तुला गाण्याची संधीही मिळाली? ज्यांची घरे पाडली गेली, त्यांना तू कधी भेटला आहे का? तुला लाज कशी वाटत नाही? असा सवालच नेटकऱ्यांनी सोनू निगमला विचारला. तर दुसरीकडे एका युजरने सोनूला शिव्या देखील घातल्या.

Singer Sonu Nigam
Shivali parab Dance Video: कल्याणच्या चुलबुलीच्या 'कोई मिल गया' गाण्यावर रोमँटिक डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

तो गायक सोनू निगम नव्हे!

खरंतर, अयोध्येवरील पोस्ट ही गायक सोनू निगमची नसून बिहारमधील रहिवासी वकिल 'सोनू निगम सिंह'ची आहे. त्या पोस्टचा आणि गायक सोनू निगमचा काहीच संबंध नाही. नावाच्या साधर्म्यामुळे काही लोकांचा गैरसमज झाला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गायक सोनू निगमनं एक्स मीडियावरील अकाउंट बंद केलं आहे. सध्या तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून दूर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com