Shivali parab Dance Video: कल्याणच्या चुलबुलीच्या 'कोई मिल गया' गाण्यावर रोमँटिक डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Shivali Parab Dance Video: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब नेहमी चर्चेत असते. शिवाली परबने नुकतीच सोशल मीडियावर एक रिल शेअर केली आहे. त्यात तिने कोई मिल गया या गाण्यावर रोमँटिक डान्स केला आहे.
Shivali parab Dance Video
Shivali parab Dance VideoSaam Tv

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब नेहमीच चर्चेत असते. शिवाली परब आपल्या कॉमेडीने तर प्रेक्षकांची मने जिंकत असते. अभिनयासोबतच शिवाली उत्तम डान्स करते. शिवालीने नुकताच सोशल मीडियावर डान्सचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओत शिवाली आणि रुपेश बने 'कोई मिल गया' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या दोघांनीही गाण्यावर खूप मस्त डान्स केला आहे. ओरिजनल गाण्यातील हुक स्टेप्स त्यांनी केल्या आहेत. या गाण्यावर शिवाली आणि रुपेशने हुबेहुब शाहरुख आणि काजोलची स्टेप केली आहे. व्हिडिओत शेवटी रुपेश शिवालीला उचलून घेऊन फिरवतो. ते दोघेही या गाण्यात हुबेहुब शाहरुख खान आणि काजोलसारखे दिसत आहेत.

Shivali parab Dance Video
Marathi Actor Reaction On Loksabha Election: कुणीही जिंकलं तरी...'; लोकसभेच्या निकालानंतर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया, म्हणाले...

शिवाली परबच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. याचसोबत शिवालीने रुपेशसोबत लोफी लव्ह या गाण्यावरदेखील डान्स केला आहे. या गाण्यात हर्ष लिंबाचिया आणि भारती दिसली होती.या गाण्यावरदेखील त्यांनी रोमँटिक डान्स केला आहे. या गाण्यावर चाहत्यांसोबत कलाकारांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Shivali parab Dance Video
Tula Shikvin Changlach Dhada: अखेर मास्तरीणबाई देणार अधिपतीसमोर प्रेमाची कबूली; 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेचा नवा प्रोमो आऊट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com