Tula Shikvin Changlach Dhada Serial Promo
Tula Shikvin Changlach Dhada Serial PromoSaam Tv

Tula Shikvin Changlach Dhada: अखेर मास्तरीणबाई देणार अधिपतीसमोर प्रेमाची कबूली; 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेचा नवा प्रोमो आऊट

Tula Shikvin Changlach Dhada Serial Promo: 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत आता अक्षरा अधिपतीला प्रपोज करताना दिसणार आहे.
Published on

मराठी मालिकाविश्वातील तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका लोकप्रिय मालिका आहे. मालिकेतील अक्षरा- अधिपतीची जोडी चाहत्यांना खूप आवडते. अक्षराने मनाविरुद्ध अधिपतीशी लग्न केले होते. परंतु आता हळू हळू अक्षराच्या मनात अधिपतीविषयी प्रेम निर्माण होत आहे. मालिकेत आता लवकरच अक्षरा अधिपतीसमोर आपल्या प्रेमाची कबुली देणार आहे.

तुला शिकवीन चांगलाच धजा मालिकेत सुरुवातील अक्षराचे अधिपतीवर प्रेम नव्हते. तिने बहिणीसाठी हे लग्न केले होते. परंतु अधिपती अक्षरावर सुरुवातीपासून प्रेम करत होता. त्यानंतर आता अक्षरादेखील त्याच्या प्रेमात पडते. त्याचीच कबुली ती येत्या भागात देणार आहे.

मालिकेच्या नव्या प्रोमोत अक्षरा अधिपती एका तलावाच्या बाजूला बोलताना दिसत आहे. अक्षरा येत्या भागात अधिपतींसमोर प्रेमाची कबुली देणार आहे. अक्षरा अधिपतीला म्हणते की, 'मी विचार करत होती की एका अडाणी माणसासोबत मी कसा संसार करणार?' यावर अधिपती म्हणतो की, 'मग तुम्ही चिडतायत कशाला?' त्यावर अक्षरा म्हणते की, 'तुम्हाला काहीच कसं समजत नाही. मी आता तुम्हाला तुमच्याच भाषेत सांगते. तुम्हासनी पाहिलं की नाय आपला विषयच हार्ड होतो. आय लव्ह यू, आय लव्ह यू अधिपती'.

Tula Shikvin Changlach Dhada Serial Promo
Celebrities Who Won Loksabha Election: लोकसभा निवडणुकीत सेलिब्रिटींचा दबदबा; कोणत्या जागेवरून कोणता तारा चमकला?

मालिकेत येत्या भागात अधिपती आणि अक्षराची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.अक्षराने आता प्रेमाची कबुली दिली आहे. या प्रेमाला भुवनेश्वरी मॅडम विरोध करणार का? अक्षरा- अधिपतीच्या प्रेमात काही विघ्न तर येणार नाही ना? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहे.

Tula Shikvin Changlach Dhada Serial Promo
Randhir Kapoor: 'मी वाईट वडिल आहे...' करीना- करिश्मा कपूरचे वडिल रणधीर कपूर यांनी केला मोठा खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com