'भूमिकन्या' साद घालण्यास सज्ज;  शेतकऱ्याच्या आयुष्यावरील मालिका लवकरच भेटीला
bhumikanya marathi serialSaam tv

bhumikanya marathi serial : 'भूमिकन्या' साद घालण्यास सज्ज; शेतकऱ्याच्या आयुष्यावरील मालिका लवकरच भेटीला

bhumikanya marathi serial Soni marathi update : सोनी मराठीवरील 'भूमिकन्या' ही माराठी मालिका प्रेक्षकांना साद घालण्यास सज्ज झाली आहे. ही मालिका १० जूनपासून प्रेक्षकांना पाहण्यास मिळणार आहे.

मुंबई : आता मराठी मालिकेत सामाजिक आणि अवतीभवती घडणारे विषय मांडले जाऊ लागले आहेत. आता या मालिकेत आणकी एका मालिकेची भर पडली आहे. ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ ही नवी मालिका ‘सोनी मराठी’ वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गौरव घाटणेकर आणि श्रृती मराठे यांच्या ब्लॅक कॉफी प्रॉडक्शनकडून ही मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे.

शेतकरी अवघ्या जगाचा अन्नदाता आहे. शेतकरी ग्राम व्यवस्था आणि कृषी समाजरचनेचा कणा आहे. सध्या शेतकरी, तंत्रज्ञानाने कितीही विकसित झाला आहे. शेतकऱ्यांनी प्रगती केली तरी आहे. तरी आताच्या शेतकऱ्याला असंख्य गोष्टींचा सामना करावा लागतो. अशाच शेतकऱ्यांच्या आयुष्यातील वेगळी बाजू दाखवणारी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ असे या मालिकेचं नाव आहे.

'भूमिकन्या' साद घालण्यास सज्ज;  शेतकऱ्याच्या आयुष्यावरील मालिका लवकरच भेटीला
Heeramandi 2nd Season : "मेहफिल फिरसे जमेगी...", ओटीटीवर पुन्हा 'हिरामंडी' गाजणार; सीरिजच्या दुसऱ्या सीझनची घोषणा

मालिकेत काय कथा आहे?

ही मालिका शेतकऱ्याच्या आयुष्यावर आधारित आहे. बळीराम असे शेतकऱ्याचे नाव आहे. तो सामान्य शेतकरी आहे. त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. या शेतकऱ्याची संघर्षमय जिद्दीची कथा आपल्यासमोर या मालिकेतून उलगडणार आहे.

'भूमिकन्या' साद घालण्यास सज्ज;  शेतकऱ्याच्या आयुष्यावरील मालिका लवकरच भेटीला
Jitendra Kumar Net Worth : साधं सिंपल राहणीमान आणि चार महागड्या मर्सिडीज; ‘पंचायत ३’ च्या ‘सचिवजी’ची संपत्ती पाहिलीत का ?

या मालिकेत नायिका लक्ष्मी ही कर्तव्य आणि प्रेम यांचा समन्वय साधते. या मालिकेतील 'भूमिकन्या' कणखरपणे वडिलांच्या पाठीशी कशी उभी ठाकते, ही रंजक कथा या मालिकेत पाहता येणार आहे.

दरम्यान, या मालिकेत अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे व अभिनेता आनंद अलकुंटे, गौरव घाटणेकर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मालिकेचं दिग्दर्शन अवधूत पुरोहित यांनी केलं आहे. ही १० जूनपासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com