Raghu 350 : 'रघु ३५०'चा धडाकेबाज पोस्टर रिलीज; चाहत्यांची उत्सुकता वाढली

Raghu 350 Poster Out : मराठी चित्रपटांची कायमच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते. मराठी सिनेसृष्टीमध्ये सध्या वेगवेगळ्या आशयघन चित्रपटांचा समावेश होत आहे.
Raghu 350 Movie Poster
Raghu 350 Poster ReleasedSaam Tv

मराठी चित्रपटांची कायमच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते. मराठी सिनेसृष्टीमध्ये सध्या वेगवेगळ्या आशयघन चित्रपटांचा समावेश होत आहे. अशातच या यादीमध्ये आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. नुकताच सोशल मीडियावर 'रघु ३५०' चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची ताणली असून हा चित्रपट येत्या २ ऑगस्ट २०२४ रोजी रिलीज होणार आहे.

Raghu 350 Movie Poster
Aditi And Siddharth : लग्नाआधीच प्रसिद्ध अभिनेत्री नवऱ्यासोबत गेली फिरायला; रोमॅंटिक फोटो केले शेअर

आशयघन आणि रहस्यमय कथानक असलेल्या ह्या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. शेअर करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये, 'रघु ३५०' असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं असून एक युवक बुलेटवरून येताना दिसत आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरून हा चित्रपट ॲक्शनची साथ देणारा असल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या २ ऑगस्ट २०२४ रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटात कोणकोणते कलाकार दिसणार अद्याप ही माहिती तरी गुलदस्त्यातच आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर असलेला बुलेट चालवणारा तो तरुण नेमका आहे तरी कोण याचीही साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Raghu 350 Movie Poster
Raghu 350 Poster OutSaam Tv

रहस्यमय चित्रपटात बाईकवरून रावडी एन्ट्री घेतलेला तो इसम नेमका कोण आहे?, हे देखील गुलदस्त्यात असून या पोस्टरवरून हा चित्रपट ॲक्शनपट असल्याचं बोललं जातं. या नव्या कोऱ्या चित्रपटातून नेमकं कोणतं कथानक मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'सुदर्शन फिल्म एंटरटेनमेंट' प्रस्तुत 'रघु ३५०' या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माते संतोष भोसले यांच्याकडे आहे. तर दिग्दर्शक आशिष मडके यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे.

Raghu 350 Movie Poster
Tejashri Pradhan Birthday : अभिनयात तरबेज असलेली तेजश्री प्रधान अभ्यासतही हुशार, व्हायचं होतं काऊन्सिलर पण...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com