Celebrities Who Won Loksabha Election: लोकसभा निवडणुकीत सेलिब्रिटींचा दबदबा; कोणत्या जागेवरून कोणता तारा चमकला?

Kangana Ranaut To Hema Malini Won Loksabha Election: देशभरात ४ जून रोजी लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यात अनेक सेलिब्रिटींनी विजय मिळवला आहे.
Celebrities Who Won Loksabha Election
Celebrities Who Won Loksabha ElectionSaam Tv
Published On

लोकसभा निवडणुकीचे निकाल काल म्हणजेच ४ जून रोजी जाहीर झाले आहेत. यात एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये जोरदार लढत पाहायला मिळाली. या लोकसभा निवडणुकीत अनेक कलाकारांनी निवडणूक लढवली होती. कंगना रणौत, मनोज तिवारी, हेमा मालिनी अशा अनेक कलाकारांनी निवडणूकीत यश मिळवले आहेत. आज आम्ही तुम्हाला ज्या कलाकारांनी लोकसभा निवडणूकीत यश मिळवले, त्यांची माहिती देणार आहोत.

कंगना रणौत (Kangana Ranaut)

कंगना रणौत यांनी यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली होती. कंगना रणौत यांनी हिमाचल प्रदेशमधील मंडी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी काँग्रेसचे विक्रमादित्य सिंग यांची पराभव केला आहे. कंगना ७४,७५५ मतांनी विजयी झाल्या आहे.

मनोज तिवारी (Manoj Tiwari)

मनोज तिवारी हे अभिनेते आणि गायकदेखील आहे. त्यांनी ईशान्य दिल्लीतून निवडणूक लढवली होती. मनोज तिवारी यांनी काँग्रेसच्या कन्हैया कुमार यांचा १३८७७८ मतांनी पराभव केला आहे. ते तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha)

शत्रुघ्न सिन्हा हे बॉलिवूडमधील मोठे नाव आहे. त्यांनी पश्चिम बंगालमधून आसनोल मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी त्रृणमूल काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. ते ५९५६४ मतांनी जिंकून आले आहेत.

Celebrities Who Won Loksabha Election
Kangana Ranaut Casts Her Vote In Mandi : लोकसभा निवडणुकीत कंगना रनौतचा विजय, मराठमोळ्या अभिनेत्याने खास अंदाजमध्ये दिल्या शुभेच्छा

हेमा मालिनी (Hema Malini)

हेमा मालिनी यांनी मथुरा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसचे मुकेश धंगर यांचा २९३४०७ मतांनी पराभव केला आहे.

अरुण गोविल (Arun Govil)

रामायण या लोकप्रिय मालिकेत अरुण गोविल यांनी रामाची भूमिका साकारली होती. त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. मेरठ मतदारसंघात त्यांनी सुनिता वर्मा यांचा १०५८५ मतांनी पराभव केला आहे.

रवि किशन

भोजपुरी अभिनेते रवि किशन यांनी गोरखपूरमधून निवडणूक लढवली होती. त्यांनी १०३५२६ मतांनी विजय मिळवला आहे,

देव अधिकारी

बंगाली चित्रपटसृष्टीतील देव अधिकारी हे अभिनेते आहे. त्यांनी भाजपच्या हिरण चॅटर्जी यांचा पराभव केला आहे.

सुरेश गोपी

सुरेप कोपी यांनी केरळमधील त्रिशूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी ७४,६८६ मतांनी विजय मिळवला आहे.

Celebrities Who Won Loksabha Election
Swapnil Joshi Film : एक हिरो अन् सहा अभिनेत्री, स्वप्नील जोशीचा 'बाई गं' केव्हा होणार रिलीज ?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com