Swapnil Joshi Film : एक हिरो अन् सहा अभिनेत्री, स्वप्नील जोशीचा 'बाई गं' केव्हा होणार रिलीज ?

Swapnil Joshi Film : अभिनेता स्वप्नील जोशीचा 'नाच गं घुमा' नंतर 'बाई गं'चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच चित्रपटाचं धमाकेदार पोस्टर रिलीज करण्यात आलं असून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
Swapnil Joshi Film : एक हिरो अन् सहा अभिनेत्री, स्वप्नील जोशीचा 'बाई गं' केव्हा होणार रिलीज ?
Bai Ga PosterSaam Tv

मराठी फिल्मइंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. सध्या बॉक्स ऑफिसवर स्त्री प्रधान चित्रपटांची क्रेझ चालु आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 'बाईपण भारी देवा' आणि 'नाच गं घुमा' नंतर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला स्वप्नील जोशीचा आणखी एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्या चित्रपटाचं नाव आहे, 'बाई गं'.... गेल्या काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानचे काही सीन्स व्हायरल झाले होते. तेव्हापासून प्रेक्षक चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत.

Swapnil Joshi Film : एक हिरो अन् सहा अभिनेत्री, स्वप्नील जोशीचा 'बाई गं' केव्हा होणार रिलीज ?
Riteish Deshmukh Post : EVM चा अर्थ तुम्हाला माहितीये का?, अभिनेता रितेश देशमुखने सांगितला मोजक्याच शब्दात अर्थ

अभिनेता स्वप्नील जोशीने 'नाच गं घुमा' चित्रपटाच्या माध्यमातून निर्माती क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. नुकतंच स्वप्नीलने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. 'नाच गं घुमा' चित्रपटानंतर स्वप्नील 'बाई गं' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्यासोबत चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत सहा अभिनेत्रीही दिसणार आहे. स्वप्नील जोशीसोबत सुकन्या मोने, नेहा खान, अदिती सारंगधर, नम्रता गायकवाड, प्रार्थना बेहरे आणि दीप्ती देवीही चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. त्यांच्यासोबतच अभिनेता सागर कारंडेही दिसणार आहे.

शेअर केलेल्या पोस्टरमध्ये, स्वप्नील नवरदेवाच्या वेशात तर या सर्व अभिनेत्री नवरीच्या वेशात दिसत आहेत. या सगळ्या अभिनेत्री स्वप्नीलच्या बायकोची भूमिका साकारणार आहेत. आता यापैकी कोणती अभिनेत्री त्याची पत्नी होणार हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

आता या सगळ्या बायका आणि स्वप्नीलची जुगलबंदी चित्रपटात कशी रंगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पांडुरंग कृष्णा जाधव यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे, तर डॉ. आशिष अग्रवाल, नीतीन प्रकाश वैद्य आणि ओ. एम. जी मीडिया चेंबर्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. १२ जुलै २०२४ ला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Swapnil Joshi Film : एक हिरो अन् सहा अभिनेत्री, स्वप्नील जोशीचा 'बाई गं' केव्हा होणार रिलीज ?
Kangana Ranaut Casts Her Vote In Mandi : लोकसभा निवडणुकीत कंगना रनौतचा विजय, मराठमोळ्या अभिनेत्याने खास अंदाजमध्ये दिल्या शुभेच्छा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com