Kangana Ranaut Casts Her Vote In Mandi : लोकसभा निवडणुकीत कंगना रनौतचा विजय, मराठमोळ्या अभिनेत्याने खास अंदाजमध्ये दिल्या शुभेच्छा

Kangana Ranaut Win From Mandi Lok Sabha : विजय मिळवल्यानंतर कंगना रणौत यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत मंडीवासीयांचे आभार मानले आहेत. अभिनेत्रीच्या ह्या पोस्टवर एका मराठमोळ्या अभिनेत्याने कमेंट केलेली आहे.
Shreyas Talapade Post : लोकसभा निवडणुकीत कंगना रनौतचा विजय, मराठमोळ्या अभिनेत्याने खास अंदाजमध्ये दिल्या शुभेच्छा
BJP candidate Kangana Ranaut casts her vote in MandiSaam Tv

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत यांनी हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभेतून विजय मिळवला आहे. त्यांनी पहिल्या निवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. मंडी मतदारसंघामध्ये कंगना यांच्या विरोधात काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह होते. विजय मिळवल्यानंतर कंगना यांनी नुकतीच इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केलेली आहे. यावेळी त्यांनी आपल्या पोस्टमध्ये मंडीवासीयांचे आभार मानले आहे. त्या पोस्टवर एका मराठमोळ्या अभिनेत्याने कमेंट केलेली आहे.

Shreyas Talapade Post : लोकसभा निवडणुकीत कंगना रनौतचा विजय, मराठमोळ्या अभिनेत्याने खास अंदाजमध्ये दिल्या शुभेच्छा
Sonu Nigam On Ayodhya : "अयोध्यावासियांसाठी 'ही' लाजिरवाणी गोष्ट...", गायक सोनू निगमची अयोध्यावासीयांसाठी खास पोस्ट

कंगनाने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत मतदारांचे आभार मानले आहेत. आभार मानताना कंगना रणौत यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "समस्त मंडीवासियांनो तुम्ही दाखवलेला विश्वास आणि दिलेलं प्रेम यासाठी मी तुमचे आभार मानते. हा विजय तुम्हा सर्वांचा आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपावरील विश्वासाचा हा विजय आहे. सनातन धर्म आणि मंडीच्या सन्मानाचा हा विजय आहे", असं कंगनाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

यावेळी कंगना यांच्या चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने कमेंट करत अभिनेत्री कंगना रणौत यांचे अभिनंदन केले आहे. श्रेयस तळपदेने "मनापासून अभिनंदन..." अशी कमेंट केली आहे. कंगना रणौत यांचा विजय जवळपास निश्चित झाला असून त्यांना नेमके किती मतं पडली आहेत, हे कळू शकलेलं नाही. अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता श्रेयस तळपदे हे दोघेही 'इमरजन्सी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार असून अद्याप रिलीज डेट जाहीर झालेली नाही.

Shreyas Talapade Post : लोकसभा निवडणुकीत कंगना रनौतचा विजय, मराठमोळ्या अभिनेत्याने खास अंदाजमध्ये दिल्या शुभेच्छा
Vedat Marathe Veer Daudale Saat : अक्षय कुमारच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात'च्या शुटिंगला ब्रेक, नेमकं कारण काय ?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com