लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप कमी जागेवर आघाडीवर आहे. त्यातच उत्तर प्रदेशमधील अयोध्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. अयोध्या लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद विजयी झाले आहेत. तर भाजपाचे लल्लू सिंह यांचा मोठा पराभव झाला आहे. अशातच या निकालावर गायक सोनू निगमने मोठी प्रतिक्रिया दिलेली आहे.
बॉलिवूडचा सिंगर सोनू निगम कायमच आपल्या गाण्यांमुळे चर्चेत असतो. पण सध्या गायक आपल्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये सोनूने अयोध्येतील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. अयोध्येच्या लोकसभेच्या निकालासंबंधित सोनू निगमने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "ज्या सरकारने संपूर्ण अयोध्येचा कायापालट केला म्हणजेच नवीन विमानतळ दिलं, रेल्वे स्टेशन दिलं, ५०० वर्षांनंतर राम मंदिर बांधलं, या मंदिराची अर्थव्यवस्था करणाऱ्या भाजपा पक्षाला अयोध्येच्या जागेवर संघर्ष करावा लागतोय. अयोध्यावासियांसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे..." असं त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय.
नुकतंच देशामध्ये १८ व्या लोकसभेसाठी ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडली. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकूण ८० जागा आहेत. त्यापैकी किमान ७० जागा जिंकू असा भाजपचा दावा होता.
ईशान्य दिल्लीचे भाजप खासदार आणि अभिनेते मनोज तिवारी यांनी पंतप्रधान मोदींसह पक्षाचे, पक्षातील वरिष्ठ कार्यकर्त्यांचे आणि मतदारसंघातील नागरिकांचेही त्यांनी यावेळी आभार मानले. पुढे मनोज तिवारी म्हणाले की, विजयाचा हा आकडा आम्ही अपेक्षित केला नव्हता. नक्कीच आमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.