Loksabha Election 2024 : शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, अमोल कोल्हेसह ‘हे’ सेलिब्रिटी निवडणुकीच्या रिंगणात!, लोकसभेत कोण ठरणार 'ब्लॉकबस्टर' ?

Loksabha Election 2024 In Celebrities : नुकताच देशामध्ये लोकसभा निवडणुक सात टप्प्यामध्ये पार पडली आहे. दरवेळी प्रमाणे यावेळीही अनेक सेलिब्रिटी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
Loksabha Election 2024 : शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, अमोल कोल्हेसह ‘हे’ सेलिब्रिटी निवडणुकीच्या रिंगणात!, लोकसभेत कोण ठरणार 'ब्लॉकबस्टर' ?
Loksabha Election 2024 In CelebritiesSaam Tv

नुकताच देशामध्ये लोकसभा निवडणुक सात टप्प्यामध्ये पार पडली आहे. दरवेळी प्रमाणे यावेळीही अनेक सेलिब्रिटी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावरील अनेक सेलिब्रिटी लोकसभा निवडणुकीत उतरले आहेत. देशातील असे अनेक मतदारसंघ आहेत, त्याठिकाणी बॉलिवूडसह टॉलिवूड सेलिब्रिटी निवडणुकीत उभे राहिले आहेत. जाणून घेऊया कोणकोणते सेलिब्रिटी लोकसभा निवडणुकीमध्ये उतरले आहेत.

Loksabha Election 2024 : शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, अमोल कोल्हेसह ‘हे’ सेलिब्रिटी निवडणुकीच्या रिंगणात!, लोकसभेत कोण ठरणार 'ब्लॉकबस्टर' ?
Raghu 350 : 'रघु ३५०'चा धडाकेबाज पोस्टर रिलीज; चाहत्यांची उत्सुकता वाढली

बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी ह्या ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. त्या उत्तर प्रदेशच्या मथुरा लोकसभेतून निवडणुकीमध्ये उभ्या राहिल्या आहेत. या जागेवरून त्या तिसऱ्यांदा निवडणुक लढवणार आहे. त्यांनी २००४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून त्या भाजपच्या तिकीटावरच लोकसभा निवडणूक लढवत आहे. दूरदर्शनवरील ‘रामायण’ या मालिकेत प्रभू श्रीरामाची भूमिका साकारलेले अभिनेते अरुण गोविलही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांची ही निवडणूक लढवण्याची पहिलीच वेळ आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठच्या जागेवरुन त्यांना भाजपाने निवडणुकीत तिकीट दिलं आहे.

Loksabha Election 2024 : शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, अमोल कोल्हेसह ‘हे’ सेलिब्रिटी निवडणुकीच्या रिंगणात!, लोकसभेत कोण ठरणार 'ब्लॉकबस्टर' ?
Aditi And Siddharth : लग्नाआधीच प्रसिद्ध अभिनेत्री नवऱ्यासोबत गेली फिरायला; रोमॅंटिक फोटो केले शेअर

रवी किशन यांनी २०१७ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता आणि २०१९ मध्ये त्यांनी भाजपच्या तिकीटावर गोरखपूरमधून सार्वत्रिक निवडणूक लढवली होती. त्यामध्ये ते जिंकले होते. आता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा ते निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे. भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी यांनी २००९ मध्ये राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी गोरखपूरमधून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, पण भाजपच्या योगी आदित्यनाथ यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर मनोज तिवारी यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

Loksabha Election 2024 : शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, अमोल कोल्हेसह ‘हे’ सेलिब्रिटी निवडणुकीच्या रिंगणात!, लोकसभेत कोण ठरणार 'ब्लॉकबस्टर' ?
Tejashri Pradhan Birthday : अभिनयात तरबेज असलेली तेजश्री प्रधान अभ्यासतही हुशार, व्हायचं होतं काऊन्सिलर पण...

बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे अभिनयासह राजकारणातील सर्वात अनुभवी व्यक्तिमत्व आहे. ते लालकृष्ण आडवाणी यांच्या काळापासून लोकसभेच्या रिंगणात आहे. त्यांनी आतापर्यंत १९९२, १९९६, २००९, २०१४ मध्ये भाजपाजच्या तिकिटावर निवडणूक लढवली. २०२४ ची निवडणुक पश्चिम बंगालमध्ये आसनसोल या जागेवरुन त्यांना तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुक लढवत आहेत. त्यांनी २०२२ मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये निवडणूक लढवत आहे. भाजपाच्या तिकिटावर पहिल्यांदाच ती लोकसभा निवडणूक लढवत आहे. खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे हे सुद्धा दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुक लढवत आहे. शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून ते निवडणूक लढवत आहे. शाहिर नंदेश उमप बसपाकडून पहिल्यांदाच लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उभे राहणार आहे. ईशान्य मुंबई मतदार संघात ते निवडणूक लढवत आहे.

Loksabha Election 2024 : शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, अमोल कोल्हेसह ‘हे’ सेलिब्रिटी निवडणुकीच्या रिंगणात!, लोकसभेत कोण ठरणार 'ब्लॉकबस्टर' ?
Mr And Mrs Mahi Collection : ‘मिस्टर अँड मिसेज माही’ला क्रिकेटप्रेमींकडून दमदार प्रतिसाद, जान्हवी कपूर आणि राजकुमार रावच्या अभिनयाची जोरदार चर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com