बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते रणधीर कपूर यांनी नव्वदीच्या दशकात चाहत्यांना आपल्या अभिनयाने वेड लावले होते. रणधीर कपूर यांच्या मुली म्हणजेच करीना कपूर आणि करिश्मा कपूर यशाच्या शिखरावर आहे. एका मुलाखतीत रणधीर कपूर यांनी करिश्मा (Karishma Kapoor)आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांच्या यशाचं श्रेय त्यांची पत्नी बबिता कपूर यांना दिलं आहे. मी खूप वाईट वडिल होतो. मी माझ्या मुलींना कधीच सपोर्ट केला नाही, असं त्यांनी सांगितलं आहे.
रणधीर कपूर यांनी एका रेडिओ चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हा मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, 'मला माझ्या मुलींचा गर्व आहे. त्यांचे जे यश आहे ते त्यांनी स्वतः मिळवलं आहे. या यशाचं श्रेय त्यांची आई बबिताला जाते. त्यांनी खूप जास्त मेहनत घेतली आहे'.
रणधीर कपूर यांनी पत्नी बबिता यांना मुलींच्या यशाचे श्रेय दिले आहे. 'जेव्हा या दोघीही लहान होत्या तेव्हा मी कधीच विचार केला नव्हता की, त्या एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी होतील. माझे वडिल राज कपूर यांनी मला जे सांगितलं तेच मी माझ्या मुलींना सांगितला. तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही पूर्ण विश्वासाने करा, असं मी त्यांना सांगितलं होतं. जर हे एक वाईट क्षेत्र असते तर आम्ही कधीच या व्यवसायात काम करत नसतो. जर आम्ही हे काम करतो तर तुम्हाला हे काम करण्यापासून कसं अडवू शकतो. परंतु तुम्ही यात खूप जास्त चांगलं काम केलं आहे. मला तुमच्यावर खूप जास्त गर्व आहे. माझा पाठिंबा नसातानाही तुम्ही खूप यश मिळवले आहे', असं त्यांनी सांगितले.
मुलींना त्यांच्या क्षेत्रात काम करण्यासाठी पाठिंबा न दिल्याने रणधीर कपूर यांनी स्वतः ला वाईट वडिल असल्याचे म्हटले आहे. 'मुलींना सपोर्ट न केल्याने मी खूप वडिल असल्याचे मला वाटत आहे. मी खूप जास्त वेंधळा आहे. मी कोणतेच काम मी नीट करत नाही. अनेकदा मला अनेक सिनेमांच्या ऑफर यायच्या. परंतु मी त्यांना नकार द्यायचो. मी माझ्या आयुष्यात जे काही कामवलंय त्यापेक्षा माझी मुलं जास्त कमावतात. त्यासाठीच मी समाधानी आहे. आमच्याकडे अन्न-कपडे सर्वकाही आहे. यापेक्षा जास्त काहीही नको. मला या वयात दिवस रात्र धावपळ करायची नाही', असंही त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.