Duniyadari Movie: 'दुनियादारी'चा सिक्वेल येतोय?, ११ वर्षांनंतर अंकुश, स्वप्नील आणि सईची मैत्री पाहायला मिळणार

Duniyadari 2 Movie Will Come: मराठीतील दुनियादारी हा लोकप्रिय चित्रपट आहे. चित्रपटाच्या यशानंतर लवकरच दुनियादारी २ चित्रपट यावा, अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली होती.
Duniyadari Movie
Duniyadari MovieSaam Tv

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणजे 'दुनियादारी'. 'दुनियादारी' चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले होते. 'दुनियादारी' चित्रपटाच्या यशानंतर लवकरच चित्रपटाचा दुसरा भाग यावा, अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आता लवकरच दुनियादारी चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशा चर्चांना उधाण आले आहे.

'दुनियादारी २' चित्रपट येण्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. या चर्चांमागचे कारण म्हणजे अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर पुन्हा एकदा एकत्र दिसले आहे. अंकुश चौधरी, सई ताम्हणकर आणि स्वप्नील जोशी काहीतरी शुटिंग करताना दिसत आहे. तर दिग्दर्शक संजय जाधवदेखील तिथे उपस्थित आहेत. त्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे.

सोशल मीडियावर सध्या सई ताम्हणकर, अंकुश चौधरी आणि स्वप्नील जोशी यांचा एक फोटो व्हायरल होत आहे.त्यात हे तिघेही चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत दिसत आहेत. त्याचसोबत एका खुर्चीवर बाप्पाचा फोटो ठेवून पुजादेखील केली आहे. यावरुनच दुनियादारी २ चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. ही पोस्ट सई ताम्हणकरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. परंतु तिने चित्रपटाबाबत कोणतेही अपडेट दिलेले नाही.

दुनियादारी चित्रपटाचा दुसरा भाग येणार की नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु या माहितीने चाहत्यांना आनंद झाला आहे. ११ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटावर प्रेक्षक आजही प्रेम करत आहे. चित्रपटातील स्वप्नील आणि अंकुशच्या मैत्रीचे आजही कौतुक होते.

Duniyadari Movie
Shivali parab Dance Video: कल्याणच्या चुलबुलीच्या 'कोई मिल गया' गाण्यावर रोमँटिक डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com