Sushmita Sen Changed DOB : सुष्मिता सेनची जन्म तारीखच बदलली, चाहते पडले विचारात, नेमकं काय झालं?
Sushmita Sen Changed Her Date Of BirthSaam Tv

Sushmita Sen Changed DOB : सुष्मिता सेनची जन्म तारीखच बदलली, चाहते पडले विचारात, नेमकं काय झालं?

Sushmita Sen Changed Her Date Of Birth : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन हिने इन्स्टाग्रामवर बायोमध्ये आपल्या दुसऱ्या जन्म तारखेचा खुलासा केला आहे.
Published on

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा (Sushmita Sen) वाढदिवस १९ नोव्हेंबर, १९७५ रोजी झाला आहे. सुष्मिताने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकलेय. सध्या सुष्मिता तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर बायोमध्ये आपल्या दुसऱ्या जन्म तारखेचा खुलासा केलेला आहे. तिने दुसरी जन्म तारीख टाकून चाहत्यांना चिंतेत टाकले आहे.

Sushmita Sen Changed DOB : सुष्मिता सेनची जन्म तारीखच बदलली, चाहते पडले विचारात, नेमकं काय झालं?
Sonu Nigam Asha Bhosle News : भरकार्यक्रमात सोनू निगमने आधी आशा भोसलेंचा पाय घुतले, नंतर माथा टेकून पडला पाया; VIDEO व्हायरल

खरंतर सुष्मिता सेनची जन्म तारीख १९ नोव्हेंबर १९७५ ही आहे. पण तिने तिच्या बायोमध्ये दुसरी जन्मतारीख टाकलेली आहे. सुष्मिताने बायोमध्ये, "दुसरी जन्मतारीख २७ फेब्रुवारी २०२३" असं लिहिलं आहे. तिच्या ह्या दोन दोन जन्मतारखेमुळे नेटकरी बुचकळ्यात पडले आहे. सुष्मिताने जन्मतारीख मध्येच का बदलली ? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Sushmita Sen News
Sushmita Sen Changed DOBSaam Tv

सुष्मिताला गेल्या वर्षी २७ फेब्रुवारी २०२३ रोजी हार्ट ॲटेक आला होता. त्यामुळे अभिनेत्रीने ती तारीख तिचा दुसरा वाढदिवस म्हणून लिहिले आहे. सुष्मिताला हार्ट ॲटेक 'आर्या ३' सीरीजच्या शुटिंगच्या दरम्यान आलेला होता. तिला हार्ट ॲटेक येण्याच्या सहा महिन्याआधीच मेडिकल टेस्ट करुन केली होती. पण तिला त्या टेस्टमध्ये हार्ट ॲटेकचे कोणतेही लक्षणं दिसले नव्हते.

Sushmita Sen Changed DOB : सुष्मिता सेनची जन्म तारीखच बदलली, चाहते पडले विचारात, नेमकं काय झालं?
Bigg Boss OTT 3 : अरमान मलिक आणि वडा पाव गर्ल बिग बॉसच्या घराबाहेर पडणार?, दुसऱ्या एलिमिनेशन राऊंडमध्ये ७ स्पर्धक

सुष्मिता सेनच्या कामाबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री शेवटची 'ताली', 'आर्या ३' वेबसीरीजमध्ये दिसली होती. 'ताली' वेबसीरीजमुळे अभिनेत्रीच्या फॅन्स लिस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

सुष्मिता सेनच्या लव्हलाईफबद्दल बोलायचे तर, सुष्मिता आणि रोहमनचं रिलेशन २०१८ पासूनचं आहे. त्यांच्यातील रिलेशनबद्दल २०१८ मध्ये चाहत्यांना माहिती दिली. त्यानंतर २ वर्षांनंतर दोघांनीही एकमेकांपासून वेगळा राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अभिनेत्रीचं ललित मोदीसोबत रिलेशन सुरू झालं. त्यांचे अनेक रोमँटिक फोटोजही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सुष्मिता आणि रोहमन ब्रेकअपनंतर पुन्हा २ वर्षानंतर रिलेशनमध्ये आले.

Sushmita Sen Changed DOB : सुष्मिता सेनची जन्म तारीखच बदलली, चाहते पडले विचारात, नेमकं काय झालं?
Hina Khan Breast Cancer : अभिनेत्री हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान, पोस्ट करत स्वत:च चाहत्यांना दिली हेल्थ अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com