साम टिव्ही ब्युरो
व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. दरम्यान, अनेक टीव्ही सेलिब्रिटी त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत.
अशातच अशी बातमी आहे की, बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनही लग्न करू शकते.
गेल्या काही दिवसांपासून सुष्मिता आपली आगामी वेब सीरीज ‘आर्या 3 अंतिम बार’ सह तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे.
सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांच्यात पॅचअप झाल्याची चर्चा आहे.
दोघेही लवकरच लग्न करू शकतात, अशी चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये आहे.
सुष्मिता सेन हिनेही तिच्या लग्नाविषयी मौन सोडलं आहे.
ती म्हणाली, 'मला माहित आहे की, मी यावर विचार करावा, असे संपूर्ण जगाला वाटते.'
सुष्मिता म्हणाली, 'वयाच्या या टप्प्यावर आल्यानंतर मी सेटल व्हायला हवं, मात्र सध्या तरी मला याकडे लक्ष द्यायचे नाही.'