Bigg Boss Marathi 5 : लयभारी! 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन येतोय; कार्यक्रमाचा होस्ट बदलला

Bigg Boss Marathi 5 Promo Out : लवकरच 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन येतोय. नुकताच कलर्स मराठीकडून या शोचा प्रोमो शेअर केलेला आहे.
Bigg Boss Marathi 5 : लयभारी! 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन येतोय; कार्यक्रमाचा होस्ट बदलला
Bigg Boss Marathi 5 Promo OutSaam Tv

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय रिॲलिटी शो म्हणजे 'बिग बॉस'. हिंदीप्रमाणेच मराठी टेलिव्हिजन सृष्टीतही 'बिग बॉस मराठी'ची जोरदार चर्चा होते. बिग बॉस मराठीचे आतापर्यंत चार सीझन झाले, आता लवकरच 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन येतोय. नुकताच कलर्स मराठीकडून या शोचा प्रोमो शेअर केलेला आहे. पहिली झलक चॅनलकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेली आहे.

Bigg Boss Marathi 5 : लयभारी! 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन येतोय; कार्यक्रमाचा होस्ट बदलला
Deepika Padukone Baby Bump : मतदानाला गेलेल्या दीपिकाचा पहिल्यांदाच दिसला बेबी बंप, रणवीर सिंगने गर्दीत घेतली पत्नीची विशेष काळजी

नुकताच कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर नवा प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे. शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये, महेश मांजरेकरांच्या ऐवजी आता रितेश देशमुख 'बिग बॉस मराठी'चा नवा होस्ट असणार आहे. "मराठी मनोरंजनाचा “BIGG BOSS” सर्वांना “वेड” लावायला येतोय... “लयभारी”होस्ट, सुपरस्टार रितेश देशमुख !" असं कॅप्शन देत हा नवा प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या शोची प्रेक्षकांना उत्सुकता होती.

नुकताच शेअर करण्यात आलेला प्रोमो पाहून 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमध्ये कोण कोण कलाकार दिसणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सर्वाधिक टीआरपी आणि नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या या शोला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतो. “बिग बॉस मराठी” च्या पहिल्या चार सीझनने मराठी प्रेक्षकांची तुफान मने जिंकले आहेत. मराठमोळ्या थिमसह बिग बॉसच्या चारही सीझनची जोरदार चर्चा झाली.आता त्याच 'बिग बॅास' मराठीच्या नव्या सीझनची जोरात तयारी सुरू झालीय.

बिग बॅासचे घर ही नेहमीच रसिकांच्या औत्सुक्याची, कुतूहलाची बाब असते. बिग बॅास मराठीचे हे आलिशान घर आकार घेऊ लागले आहे. तसेच बिग बॅासच्या घरातील अतरंगी मोहरे यांचीही कसून निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या सिझनमध्ये बिग बॅासच्या या घरात आणखी काय काय नाविन्य असेल, काय एक्स्ट्रा गॅासिप अर्थात एक्स्ट्रा मनोरंजन पहायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi 5 : लयभारी! 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन येतोय; कार्यक्रमाचा होस्ट बदलला
Yami Gautam Welcome Baby Boy : यामी गौतमने दिला गोंडस मुलाला जन्म, फोटो शेअर करत सांगितलं नाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com