Bigg Boss OTT 3 कधी येणार भेटीला ?, नवीन होस्ट अनिल कपूर यांनी तारीख सांगितली

Bigg Boss OTT 3 Streaming Date : 'बिग बॉस ओटीटी ३' या शोची स्ट्रीम डेट जाहीर करण्यात आलेली आहे. त्यासोबतच अनिल कपूरचा फर्स्ट प्रोमोही शेअर करण्यात आलेला आहे.
Bigg Boss OTT 3 कधी येणार भेटीला ?, नवीन होस्ट अनिल कपूर यांनी तारीख सांगितली
Bigg Boss OTT 3Instagram

गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक 'बिग बॉस ओटीटी ३'च्या रिलीज डेटसाठी प्रेक्षक आतुर होते. अखेर त्या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस ओटीटी ३'चा पहिला प्रोमो रिलीज झालेला होता. त्यामध्ये, होस्ट म्हणून बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर म्हणून दिसला होता. आता प्रेक्षकांसमोर 'बिग बॉस ओटीटी ३' या शोची स्ट्रीम डेट जाहीर करण्यात आलेली आहे. त्यासोबतच अनिल कपूरचा फर्स्ट प्रोमोही शेअर करण्यात आलेला आहे.

Bigg Boss OTT 3 कधी येणार भेटीला ?, नवीन होस्ट अनिल कपूर यांनी तारीख सांगितली
Ranbir Kapoor Ramayana Movie : 'धार्मिक कथांची छेडछाड करणे योग्य नव्हे'; रणबीर- साई पल्लवीच्या 'रामायणा' वर सीता नाखूश

काही तासांपूर्वीच जिओच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम पेजवर आणि अनिल कपूरच्या ऑफिशियल इन्स्टाग्रामवर 'बिग बॉस ओटीटी ३'चा फर्स्ट लूक शेअर करण्यात आलेला आहे. "प्रेझेंटिंग अनिल कपूर 'बिग बॉस ओटीटी ३' शोचा नवीन होस्ट! अनेक चित्रपट गाजवल्यानंतर आता अनिल कपूर बिग बॉस हाऊसमध्ये सत्ता गाजवणार आहे. एक्स्ट्रा कुछ खास! २१ जूनपासून अनिल कपूरची खास जादू बघायला मिळणार आहे." असं कॅप्शन अभिनेत्याने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करताना दिली आहे.

'बिग बॉस ओटीटी ३' होस्ट करण्याविषयी अनिल कपूर म्हणाला, "बिग बॉस ओटीटी आणि मी एक ड्रीम टीम आहे. आम्ही दोघेही मनाने तरुण आहोत. लोकं अनेकदा म्हणतात की, मी दिवसेंदिवस लहानच होत चाललोय, खरंतर बिग बॉसचं हेच एक खास वैशिष्ट्य आहे. सध्या मी काही तरी, रोमांचक गोष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. मी बिग बॉसची हिच उर्जा आणखी वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. मी यासाठी आता आणखी वाट बघू शकत नाही." मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस ओटीटी ३' मध्ये आशिष शर्मा, प्रतीक्षा होनमुखे, शहजादा धामी, विकी जैन, शीझान खान, अरहान बहल आणि खुशी पंजाबन यांसारखे सेलिब्रिटी या शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसण्याची शक्यता आहे.

Bigg Boss OTT 3 कधी येणार भेटीला ?, नवीन होस्ट अनिल कपूर यांनी तारीख सांगितली
Ayodhya Election Result: अयोध्या नगरीत भाजप पराभूत, समाजवादी पक्ष विजयी, ‘रामायण’मधील लक्ष्मण नाराज, म्हणाले...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com