Ranbir Kapoor Ramayana Movie : 'धार्मिक कथांची छेडछाड करणे योग्य नव्हे'; रणबीर- साई पल्लवीच्या 'रामायणा' वर सीता नाखूश

Deepika Chikhliya Said Dont Remake Of Ramayana : रामानंद सागर यांच्या 'रामायण' फेम दीपिका चिखलियाने या चित्रपटाबाबत आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. हा चित्रपट बनवू नये असे तिचे स्पष्ट मत आहे.
Ranbir Kapoor Ramayana Movie : 'धार्मिक कथांची छेडछाड करणे योग्य नव्हे'; रणबीर- साई पल्लवीच्या 'रामायणा' वर सीता नाखूश
Deepika Chikhliya Said Dont Remake Of RamayanaSaam Tv
Published On

बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर सध्या 'रामायण' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. तो या चित्रपटामध्ये प्रभू श्री रामाची भूमिका साकारणार आहे. त्याच्यासोबत टॉलिवूड अभिनेत्री साई पल्लवीही दिसणार आहे. ती सीतेच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. रणबीर कपूरच्या ह्या बहुप्रतिक्षित चित्रपटाची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत आहेत तर दुसरीकडे काही लोकांनी यावर आपली नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळत आहे. रामानंद सागर यांच्या 'रामायण' फेम दीपिका चिखलियाने या चित्रपटाबाबत आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. हा चित्रपट बनवू नये असे तिचे स्पष्ट मत आहे.

Ranbir Kapoor Ramayana Movie : 'धार्मिक कथांची छेडछाड करणे योग्य नव्हे'; रणबीर- साई पल्लवीच्या 'रामायणा' वर सीता नाखूश
Ayodhya Election Result: अयोध्या नगरीत भाजप पराभूत, समाजवादी पक्ष विजयी, ‘रामायण’मधील लक्ष्मण नाराज, म्हणाले...

इंडिया टुडेसोबत बोलताना दीपिका चिखलियाने नितेश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटावर आपले मत व्यक्त केले. ती म्हणाली, "लोकांनी धार्मिक ग्रंथांशी छेडछाड करू नये. प्रामाणिकपणे सांगायचे तर, जे लोक रामायण बनवत आहेत त्यांच्यावर मी खूप नाराज आहे. असे करू नये असे माझे स्पष्ट मत आहे. सारख्या सारख्या 'रामयण'वर आधारित कलाकृती बनवू नये. प्रत्येक वेळी निर्माते आणि दिग्दर्शक नवीन कथा, नवीन अँगल, नवीन लूक... काहीतरी वेगळं करण्याचे प्रयत्न करतात." या शब्दात दीपिकाने आपली चित्रपटाबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे.

यासंबंधित पुढे बोलताना दीपिकाने'आदिपुरुष' या चित्रपटाचा देखील उल्लेख केला. ती म्हणाली की, "क्रिती सेनॉनला चित्रपटात गुलाबी रंगाची सॅटिन साडी देण्यात आली होती. सैफ अली खानला त्यात काहीतरी वेगळाच लूक देण्यात आला होता. तर अशा परिस्थितीत तुम्ही 'रामायण'चा पूर्णपणे मुळ उद्देशच तुम्ही बदलत आहात. हे कोणी करू नये असे मला वाटते. धार्मिक ग्रंथाचा चुकीचा वापर करू नये. रामायण ऐवजीही चित्रपट बनवण्यासाठी अनेक विषय आहेत. स्वातंत्र्य सैनिकांवर आधारित अनेक चित्रपट बनवण्यासारखे आहेत, ते बनवा." अशी प्रतिक्रिया दीपिका चिखलियाने दिली.

Ranbir Kapoor Ramayana Movie : 'धार्मिक कथांची छेडछाड करणे योग्य नव्हे'; रणबीर- साई पल्लवीच्या 'रामायणा' वर सीता नाखूश
Sonu Nigam Trolling : गायक सोनू निगम नेटकऱ्यांवर भडकला, अयोध्येवरील 'त्या' पोस्टवरून चांगलंच सुनावलं

नुकताच रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता रणबीर त्याच्या आगामी चित्रपट 'रामायण'च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्री रामाची भूमिका साकारणार आहे. तर साई पल्लवी आई सीतेच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नितेश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटामध्ये रणबीर, साई पल्लवीसोबतच अजून अनेक स्टार आपल्याला पाहायला मिळणार आहे. अभिनेता यश 'रावण'ची भूमिका साकारणार आहे तर 'हनुमान'च्या भूमिकेत आपल्याला अभिनेता सनी देओल पाहायला मिळणार आहे.

Ranbir Kapoor Ramayana Movie : 'धार्मिक कथांची छेडछाड करणे योग्य नव्हे'; रणबीर- साई पल्लवीच्या 'रामायणा' वर सीता नाखूश
Kiran Mane Post : "२ मिस्ड कॉल, 'जय महाराष्ट्र'चा मेसेज अन् फोनवरून संवाद"; किरण माने-उद्धव ठाकरेंमध्ये नेमकं काय बोलणं झालं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com