Upendra Limaye News : उपेंद्र लिमयेने खरेदी केली अलिशान महागडी कार; सहकुटुंब केली नव्या कारची पूजा, पाहा VIDEO

Upendra Limaye Bought New Car : अभिनेता उपेंद्र लिमयेने नवीन अलिशान कार खरेदी केली आहे. हा कार खरेदी केल्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.
Upendra Limaye News : उपेंद्र लिमयेने खरेदी केली अलिशान महागडी कार; सहकुटुंब केली नव्या कारची पूजा, पाहा VIDEO
Upendra Limaye Bought New CarSaam Tv

दमदार शरीरयष्टी आणि भारदस्त आवाजामुळे अभिनेता उपेंद्र लिमयेने मराठी फिल्म इंडस्ट्रीसह बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये विशेष प्रसिद्धी मिळवली आहे. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'ॲनिमल' चित्रपटामुळे अभिनेत्याला विशेष लोकप्रियता मिळाली आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावलं होतं. यामुळे तो लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अभिनेता लोकप्रियतेच्या शिखरावर असताना त्याने नवीन अलिशान कार खरेदी केलेली आहे. हा कार खरेदी केल्याचा व्हिडिओ महिंद्रा कंपनीच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आलेला आहे.

Upendra Limaye News : उपेंद्र लिमयेने खरेदी केली अलिशान महागडी कार; सहकुटुंब केली नव्या कारची पूजा, पाहा VIDEO
Shalini Pandey : ‘महाराज’ चित्रपटातील ‘त्या’ सीननंतर डिस्टर्ब झाली होती शालिनी पांडे, सांगितला शुटिंग दरम्यानचा किस्सा

उपेंद्र लिमये यांनी महिंद्रा कंपनीची नवीकोरी अलिशान कार खरेदी केली आहे. कार खरेदी करताना उपेंद्र लिमये यांच्यासोबत त्यांच्या फॅमिलीनेही उपस्थिती लावलेली होती. अभिनेत्यासह त्यांच्या फॅमिलीच्या चेहेऱ्यावरीलही आनंद स्पष्ट दिसत आहे. नवी कार खरेदी करतानाचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, त्यांच्या मुलांनी कारवरील पडदा बाजूला सारत गाडीची पहिली झलक चाहत्यांना दाखवली. त्यानंतर त्यांच्या पत्नीने कारची पूजा केली. अभिनेत्याने नवीन कार खरेदी करताच चाहत्यांकडून अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, उपेंद्र लिमयेने ब्लॅक कलरची महिंद्रा एसयुव्ही ७०० कार खरेदी केलेली आहे. अभिनेत्याने कार खरेदी केल्यानंतर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटी मित्रांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. उपेंद्र लिमये यांना 'जोगवा' चित्रपटातून विशेष प्रसिद्धी मिळाली. उपेंद्र लिमये २०२३ मध्ये रिलीज झालेल्या 'मडगाव एक्सप्रेस' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर त्यांचा शेवटचा चित्रपट 'ॲनिमल' ठरला होता. सध्या चाहते उपेंद्र यांच्या आगामी चित्रपटासाठी उत्सुक आहेत.

Upendra Limaye News : उपेंद्र लिमयेने खरेदी केली अलिशान महागडी कार; सहकुटुंब केली नव्या कारची पूजा, पाहा VIDEO
Shivani Kumar : "पाठीमागून नाही, थेट तोंडावर बोलायचं..."; शिवानी कुमार बिग बॉसच्या घरातल्या स्पर्धकांवर संतापली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com