

गॅस टंचाईचा फटका पुण्यातील स्मशानभूमींनाही बसला.
पुणे महापालिकेने १८ गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद केल्या.
गॅस पुरवठा कमी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
आखाती देशांमधील युद्धाचे पडसाद फक्त शेअर बाजार किंवा पेट्रोल पंपावरच उमटतायत, असं नाही तर ही धग आता आपल्या घरापर्यंत आणि दुर्देवानं स्मशानभूमीपर्यंतही पोहचलीय...गॅस टंचाई निर्माण झाल्यामुळे पुण्यातील तब्बल 18 गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय.
पुणे शहरात एकूण 62 दाहिन्या आहेत. त्यातील 18 दाहिन्या एलपीजी गॅसवर तर 10 विद्युत दाहिन्या आहेत. त्याव्यतिरिक्त लाकडं आणि इतर इंधनांवर 34 दाहिन्या चालतात. तर दररोज 112 लोकांवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतात. दरम्यान स्मशानभूमीतील गॅस दाहिन्या बंद केल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुसरीकडे महापालिका आयुक्तांनी गॅस सोडून इतर दाहिन्यांचा वापर वाढवणार असल्याचं सांगून लोकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन केलयं. गॅसचा तुटवटा साऱ्या देशात निर्माण झालाय. मात्र त्याचा फटका थेट अंत्यसंस्कारालाही बसल्य़ामुळे हे संकट पुढच्या काळात अधिकच वाढत जाणार असल्याचं चित्र आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.